निरा नरसिंहपुर:
इंदापूर तालुक्यातील गिरवी या गावामध्ये महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री व इंदापूर तालुक्याचे आमदार श्री दत्ता मामा भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य असे रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे आयोजन हे ग्रामपंचायत गिरवी आणि मुक्ताई ब्लड बँक इंदापूर व कै.भगवानराव भरणे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. या शिबिरामध्ये एकूण 71 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या भव्य आणि दिव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत आबा कोकाटे आणि श्रीमंत ढोले सर यांच्या हस्ते झाले. या शिबिरामध्ये माननीय सरपंच पांडुरंग डिसले, उपसरपंच दादासाहेब क्षीरसागर, ग्रा. सदस्य अनिल क्षीरसागर, माऊली शिंदे ,आनंद ठोकळे, पोपट कोरे, पोलीस पाटील भैय्यानंद ठोकळे, अरुण क्षीरसागर, नामदेव क्षीरसागर, संतोष क्षीररसागर, उमाजी बंडलकर, राजेंद्र जगताप, हिंमत देवकर, विठ्ठल ठोकळे, लालासो क्षीरसागर, पंपू बंडलकर, पांडुरंग गोखले,विठ्ठल शिंदे, महेश क्षीरसागर, अमोल क्षीरसागर, श्रीकांत कोकाटे, उमेश क्षीरसागर, रणजीत क्षीरसागर, प्रशांत देवकर, अतुल डिसले, पप्पू भंडलकर दत्तात्रय ठोकळे, विकास शिंदे,विकास क्षीरसागर तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.”रक्तदान हेच जीवनदान आहे” या उक्तीप्रमाणे गिरवी ग्रामस्थांनी अतिशय छान पद्धतीने रक्तदान शिबिराचा कार्यक्रम पार पाडला व भरणे मामा यांना अशा पद्धतीचा उपक्रम राबवून त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा सामाजिक उपक्रम राबवून दिल्या. हा इंदापूर तालुक्यातच नव्हे तर महाराष्ट्र राज्यामध्ये आदर्श घेण्यासारखा उपक्रम या ग्रामपंचायतीने राबवला व भरणे मामांच्या हातून इंदापूर तालुक्याचा छान असा विकास आत्ता होत आहे असाच पुढे विकास होत राहो अशी देवाच्या चरणी प्रार्थना केली. यामध्ये प्रत्येक रक्तदात्यांना एक पाण्याचा जार किंवा जर्किन देण्यात आले तसेच आलेल्या रक्तदात्यांना चहा पाणी नाश्ता आणि जेवणाची सोय ही ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आली अशा पद्धतीने रक्तदान शिबिराचे आयोजन हे अतिशय छान आणि निटनिटके पद्धतीने करण्यात आले.