निरा नरसिंगपूर: दिनांक:१२.
प्रतिनिधी: डॉ.सिद्धार्थ सरवदे.
बावडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्यासर्वच गावांमध्ये शेतकऱ्यांच्या मोटारी कॅबला यांची मोठ्या प्रमाणावर चोरी होत असल्यामुळे या भागातील शेतकरी हवालदिल झालेला आहे याच पार्श्वभूमीवर बावडा परिसरातील शेतकरी व पोलिस प्रशासनाशी संयुक्त बैठक घेण्यात यावी अशा शेतकरी संघर्ष समितीच्या विनंतीला मान देऊन इंदापूर पोलीस स्टेशनचे पी.आय.मुजावर साहेब यांनी तात्काळ मीटिंग घेण्याचे आदेश दिले व परिसरातील शेतकऱ्यांची संयुक्त बैठक बावडा या ठिकाणी घेण्यात आली. या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आदेश बावडा पोलीस स्टेशनच्या टीमला मुजावर साहेबांनी दिले. यावेळी सर्वच पक्षांमध्ये काम करणारे शेतकरी एका ठिकाणी आल्यामुळे पोलीस प्रशासनाने शेतकऱ्यांचे आभार मानले त्यावेळी पोलिस स्टेशनचे ए .पी.आय .नागनाथ पाटील साहेब म्हणाले की या भागामध्ये होत असलेल्या चोऱ्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करत असून याातील तीन आरोपींना पकडले असून मुद्देमाल हस्तगत केला आहे परंतु याच्या मधील आरोपी अल्पवयीन असल्यामुळे तपासात अडथळे येत होते हा माल भंगारच्या दुकानांमध्ये विकला जातो. हे पुढील काही दिवसांमध्ये आम्ही समाधानकारक कामगिरी करून या सर्व चोऱ्यांचे प्रमाण कमी करूनया भागातील जास्तीत जास्त आरोपी पकडू असे आश्वासन शेतकरी संघर्ष समितीला मुजावर साहेबां समक्ष दिले यावेळी सचिन सावंत,महादेव घाडगे,सुरेश शिंदे सर,सचिन कदम, बावडा परिसरातील असंख्य शेतकरी उपस्थित होते.