महाराष्ट्र राज्य ग्रामविकास विभाग यांच्या दिनांक 1 जून 2021 रोजीच्या परिपत्रकानुसार 6 जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये “शिवस्वराज्य दिन” म्हणून साजरा करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज दिनांक 06 जून 2022 रोजी आपल्या मोडनिंब ग्रामपंचायत कार्यालयात साजरा करण्यात आला.
शिवस्वराज्य दिन सोहळ्यास मोडनिंब ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. मीनाताई शिंदे, सरपंच प्रतिनिधी अनिल आप्पा शिंदे उपसरपंच श्री. दत्ता बापू सुर्वे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य कैलास दादा तोडकरी, सदाशिव पाटोळे, बालाजी भाऊ पाटील, सोमनाथ नाना माळी, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी अतुल गाडे, अनिल सावंत, माजी ग्रामपंचायत सदस्य उदय जाधव, VBP न्यूज चे पत्रकार बाळासाहेब ओहोळ, कराटे असोशियन चे प्रशिक्षक शंकर जाधव, ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी अरुण सुर्वे, बिभीषण गायकवाड, नितीन खिलारे, विनोद नागटिळक इत्यादी उपस्थित होते.