प्रतिनिधी-पोपट वाघमारे
दिघंची शहरात गेली पंधरा वर्षे झाली शहारात रखवालदार म्हणून नेत्र बहादुर खत्री हे दिवस रात्र पहारा देत आहेत.पण ते पैशा विना उपेक्षित च आहेत त्यांचा प्रपंच कसा चालायचा असा प्रश्र्न रखवालदारापुढे पढला आहे.दिघंची शहर हे सांगली सातारा सोलापूर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे.या शहरात मोठ्या प्रमाणात लोकांची वर्दळ असते पोलिस कर्मचारी असूनही गोरखा (रखवालदार) हे आपली ड्युटी प्रामाणिक पणे बजावत आहेत.दिघंची शहर हे मोठ्या लोकसंख्येचे आहे येथे पोलीस चौकी असताना सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून गुरखा हे दिघंची शहराची रखवालदारी म्हणून काम करीत आहेत पण त्यांना उदरनिर्वाह करण्यासाठी लोकांनी मदत करणे अपेक्षित आहे.शहरात चोर्या होऊ नये म्हणून दिवस रात्र पहारा देत रखवालदार नेत्र बहादुर खत्री हे आपली ड्युटी प्रामाणिक पणे बजावत आहेत.आशा या रखवालदाराला लोकांनी मदत करून शहराची रखवालदारी करून सुरक्षित राहण्यासाठी रखवालदार जगला पाहिजे या उद्देशाने मदत करणे अपेक्षित आहे.
ज्यांना मदत करायची आहे अशा लोकांनी थेट मदत करावी अथवा जनविद्रोही प्रतिनिधी पोपट वाघमारे यांच्याशी संपर्क करावा