प्रतिनिधी-पोपट वाघमारे
आटपाडी तालुक्यातील दिघंची येथील शिक्षक नंदकुमार वाघमारे बालक वाघमारे यांचे वडील गेल्या वर्षी कोव्हीड होऊन मरण पावले त्यांना एक वर्ष पूर्ण होताच स्वताच्या विधवा आई व इतर सात विधवा महिलांचे अनिष्ट रूढी परंपरा समजावून सांगून परिवर्तन घडवून हळदी कुंकू हिरवा चुडा व हिरवी साडी देवून सन्मान केला . 31 मे या दिवशी शकुंतला तुकाराम वाघमारे यांनी पतीच्या पहिल्या पुण्यस्मरण दिनादिवशी विधवा प्रथा प्रतिबंध करणेसाठी ऐतिहासिक पाऊल उचलून हळद कुंकू कार्यक्रम सादर करण्यात आला. तसेच समजातील अनेक विधवा महिलांनी हळद कुंकू लावून प्रथा नष्ट करण्याची मुहूर्त मेढ रोवली.या प्रसंगी सर्व महिलांनी पती निधनानंतर बांगड्या न फोडणे,कुंकू न पुसणे,मंगळसूत्र न काढणे,जोडवी न काढणे बाबत प्रतिज्ञा घेतली. या विधवा महिलांना नंदकिशोर वाघमारे यांचे परिवार मार्फत सौभाग्यचे लेणे म्हणून हिरवी साडी , हिरव्या बांगड्या, हळद कुंकू करंडा,व ओटीचे साहित्य भेट देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी दिघंची गावचे आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हणमंतराव देशमुख यांनी स्त्रीला समान संधीचा,जगण्याचा अधिकार आहे तसेच समाजातील अनिष्ठ चालीरीती, कुप्रथा नष्ट करण्याची धाडसी पाऊल आसलेचे प्रतिपादन केले. तसेच सांगली जिल्हा ओबीसी संघटनेचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सावता पुसावळे व आटपाडी तालुका भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य प्रणव गुरव यांनी ही आपले मौलिक विचार व्यक्त केले. स्री ही पुरुषाची अर्धांगिनी आहे.तिला विद्रुप करण्याचा समाजाला कोणताही अधिकार नाही. त्या स्त्री ची इच्छा असेल तर तिला स्त्री व सॊभाग्य अलंकार घालण्याचा पूर्ण अधिकार आहे। आज याना काही स्त्रिया नावे ठेवतील पण त्याच उद्या जय जय कार करतील. या प्रसंगी सावित्रीबाई फुले व महात्मा जोतिभा फुले, शाहू महाराज,राजाराम मोहन रॉय ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनेक सामाजिक परिवर्तना मधील अनेक उदाहरणें देण्यात आली. दिघांची गावचे सरपंच अमोल मोरे यांनी ग्रामपंचायत यांचे वतीने शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विलास खरात , संजय वाघमारे,विजय वाघमारे, बालक वाघमारे ,पोपट वाघमारे ,कवी राहुल वाघमारे सुरेश सावंत उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक भिसे,यांनी केले तर आभार नंदकिशोर वाघमारे जिल्हा निरीक्षक ह्यूमन राईट सातारा यांनी यांनी केले.विद्यार्थ्याना काल कथित तुकाराम वाघमारे यांचे स्मृतिप्रीत्यर्थ मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून कार्यक्रम संपन्न झाला.