श्रीपुर प्रतिनिधी,
आंबेडकरी चळवळीतील एक महागायिका म्हणून अवघा महाराष्ट्र गाजवलेल्या कडुबाई खरात यांचा बहारदार कार्यक्रम डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे वतीने आज सायंकाळी सहा वाजता श्रीपूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समोर आयोजित करण्यात आला आहे ,अशी माहिती स्मारक समितीचे संदीप घाडगे यांनी दिली आहे.
” तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रे “
या लोकप्रिय गाण्यानं महाराष्ट्राला भुरळ घातली आहे. सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यात प्रथमच कडुबाई खरात यांचा श्रीपूर येथे कार्यक्रम होत आहे. खरात यांच्या कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. अत्यंत भव्य देखणे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे एकतीस व्या जयंतीनिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे वतीने आयोजित करण्यात आला आहे.
माळशिरस तालुक्यातील तमाम आंबेडकरी जनता मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम ऐकण्यासाठी येणार आहे. आजचा कार्यक्रमानिमित्त तालुक्यातील भिमसैनिक आबालवृद्ध महिला भगीनी यांचे एकीचे दर्शन होणार आहे अशी माहिती संदीप घाडगे यांनी दिली आहे.