प्रतिनिधी : युवराज नरुटे(9011394020)
तरंगफळ गावचे सामाजिक कार्यकर्ते नारायण (तात्यासाहेब)तरंगे यांनी आपल्या 50 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून तरंगफळ गावामध्ये जवळपास वेगवेगळ्या कंपनीचे नवीन 10 ट्रॅक्टर युवकांनी खरेदी केले व आपल्या व्यवसायाची सुरुवात केली, त्यांच्या व्यवसायाला प्रोत्साहित करण्यासाठी तात्यासाहेब तरंगे यांनी त्यांना शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केला, व व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.व त्यांच्या बरोबर शाळा समितीचे माजी अध्यक्ष म्हाकुदेव साळवे यांचाही वाढदिवस साजरा केला.
यावेळी धानोर गावचे सरपंच जीवन उत्तमराव जानकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने-पाटील, मा उपसरपंच अविनाश तरंगे, भाजपचे संजय देशमुख, शिवाजी वाघमोडे, गोविंद कांबळे, सुजित तरंगे, भागवत तरंगे, सर्जेराव पिंगळे, महादेव तरंगे,बाजीराव तरंगे, ग्रा प सदस्य महादेव गोरड, मा सरपंच नारायण करचे, लालासाहेब साळवे आजी ,माजी, ग्रामपंचायत सरपंच , सदस्य तसेच समस्त ग्रामस्थ तरंगफळ.
त्यांच्या या उपक्रमाचे गावातील लोकांकडून कौतुक केले जात आहे, त्याचप्रमाणे त्यांचा राजकीय व सामाजिक कार्यात नेहमीच सहभाग असतो, गावातील गोरगरीब जनतेला त्यांचा मदतीचा हात नेहमीच पुढे असतो, गावातील होतकरू व व्यावसायिक तरुणांना ते नेहमीच मार्गदर्शन व सहकार्य करतात.
त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व त्यांच्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा.