कार्यशाळा – कोविडचे अनुभव व धडे: आरोग्यासंबंधी नवी-जुनी आव्हाने आणि आरोग्य व्यवस्था पुनर्बांधणीची दिशा
दिनांक- गुरुवार, ५ मे २०२२
वेळ- सकाळी १०.३० ते सायं: ५ वा
ठिकाण- ———
कोविड काळात एका बाजूला सार्वजनिक आरोग्य सेवा कोरोनाशी लढा देत होती. तर खासगी आरोग्य व्यवस्थेमधील बहुतांश दवाखाने पहिल्या लाटेतून उभारी घेऊन कोविड साथ रोगाचा पुरेपूर फायदा घेत होते. बहुतांशी घरातील लोक मृत्युमुखी पडले तर आजारातून बरे झालेल्यांना कर्जबाजारी व्हावे लागले. या काळात सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आणि खासगी आरोग्य व्यवस्थेचे आपल्याला अनेक बरे वाईट अनुभव आले आहेत. असंख्य लोकांना असहाय्य वाटले होते. या काळातील शिदोरी आपल्या सर्वांचेच डोळे उघडण्यासाठी महत्वपूर्ण आहे. यावर एकत्रित चर्चा करणे आणि उपायांवर कृती करणे यासाठी आपण दिनांक ५ मे २०२२ याबाबत कार्यशाळेचे आयोजन करत आहोत. रूग्ण हक्क सनदेची अंमलबावणी आणि दर्जेदार सरकारी सेवाचा आग्रह ही चर्चा या कार्यशाळेचा गाभा असणार आहे.
तरी आपण या कार्यशाळेत उपस्थित राहून आपल्या शहराची, आपल्या तालुक्याची आरोग्य व्यवस्था लोकहिताची बनवण्याच्या दृष्टीने आपले योगदान द्यावे, ही विनंती!
आपले योगदान आपले आणि आपल्या पुढच्या पिढ्यांचे आरोग्य भवितव्य सुरक्षित ठेवण्यास निश्चितच महत्वाचे ठरेल.
धन्यवाद!
आपले: शहाजी गडहिरे, भाऊसाहेब अहिरे आणि विनोद शेंडे
संपर्क- शहाजी गडहिरे (सांगोला, सोलापूर) 9822972559 , विनोद शेंडे (पुणे) 9975639717
एकमेकांना सोबत देऊया! सुदृढ आरोग्य व्यवस्थेचे साथी बनूया!!