गुणवंत कामगार कल्याण मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात भव्य गुणवंत कामगार स्नेह मेळावा व परिसवांदाचे आयोजन करण्यात येणार आहे.असे मंडळाच्या संस्थापक – अध्यक्षा डॉ.भारती चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु मान.डॉ.श्री एस एन पठाण यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे
मेळाव्यास महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे आयुक्त श्री रविराज इळवे,पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्री राजेश पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ.श्री संजय शिंदे आणि विभागीय कामगार आयुक्त श्री अभय गीते हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी सातत्याने केलेल्या कार्याबद्दल महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांजकडून पिंपरी चिंचवड शहरातील हाफकिन जीव औषधे निर्माण महामंडळ या संस्थेला “रायबहादूर नारायण मेघाजी लोखंडे कामगार मित्र पुरस्कार – २०१९” जाहीर झाला असून कामगार क्षेत्रातील महत्त्वाचा राज्यस्तरीय कामगार भुषण पुरस्कार कमिन्स इंडिया लिमिटेडचे कर्मचारी, गुणवंत कामगार, कवी श्री राजेंद्र वाघ यांना जाहीर झाला आहे.या पार्श्वभूमीवर गुणवंत कामगार कल्याण मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधून गुरुवार, दि.५ मे २०२२ रोजी दु.३:०० वा. अॅटो क्लस्टर सभागृह, चिंचवड येथे गुणवंत कामगार व त्यांच्या कुटुंबियांचा भव्य स्नेहमेळावा आयोजित केला आहे.
थायसन कृप इंडस्ट्रीजचे माजी संचालक मान. श्री आर एस नागेशकर यांच्या अध्यक्षतेखाली “गुणवंत कामगार पुरस्कार मिळल्यानंतरची कामगारांची भूमिका” या विषयावर परिसंवाद होणार आहे.त्यामध्ये समाधान भोसले(सहायक आयुक्त,महा.काम.क.मंडळ),संतोष दळवी(जनरल सेक्रेटरी, टाटा मोटर्स कामगार संघटना), सुधीर सरोदे(उपाध्यक्ष, किर्लोस्कर कमिन्स कामगार संघटना), डॉ. शैलजा करोडे (पंजाब नॅशनल बँक),युवराज रणावरे (कामगार भूषण व साखर कारखाना नेते) यांचा सहभाग राहणार असून साहित्यिक राज अहिरराव हे त्यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत.
गुणवंत कामगार कल्याण मंडळ हे कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवून वाटचाल करीत आहे.मंडळाच्या कामकाजासाठी राज्यतरीय समिती,पिंपरी – चिंचवड शहर समिती ,पुणे शहर समिती व पुणे जिल्हा समिती तयार करण्यात आलेल्या असून त्यांच्या नियुक्तीचे पत्र देण्यात येणार आहे.त्याचबरोबर शहरातील कामगार भूषण पुरस्कार्थी, सन २०१५,२०१७ आणि २०१९ चे गुणवंत कामगार पुरस्कार्थी यांना “श्रम गौरव” पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.तसेच ज्येष्ठ गुणवंत कामगार, पंतप्रधान श्रम पुरस्कारप्राप्त गुणवंत, सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्ववान महिला, सातत्याने सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या कामगार कार्यकर्त्यांच्या संस्था आणि आपल्या उद्योगासह राष्ट्रीय आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यवस्थापनाचा येथोचित सन्मान करण्यात येणार आहे.
पुणे, पिंपरी – चिंचवड शहर व जिल्ह्यातील सर्व आजी माजी गुणवंत कामगारांनी व श्रमिकानी या मेळाव्यास उपस्थित राहाण्याचे आवाहन गुणवंत कामगार कल्याण मंडळ राज्यस्तरीय समितीचे उपाध्यक्ष राज अहेरराव,तानाजी एकोंडे,सचिव राजेश हजारे,सहसचिव संजय गोळे,खजिनदार भरत शिंदे, सहखजिनदार गोरखनाथ वाघमारे, सदस्य श्रीकांत जोगदंड,कल्पना भाईगडे, पिं. चिं.शहराध्यक्ष बशिर मुलाणी, पुणे शहराध्यक्ष महादेव धर्मे,पुणे जिल्हाध्यक्ष प्रकाश शिंदे, सातारा जिल्हाध्यक्ष महेंद्र पवार,नाशिक जिल्हाध्यक्ष विलास गोडसे यांनी केले आहे.