(लेखक सामाजिक कार्यकर्ते असून सेंट्रल ह्यूमन राईट संघटन चे नॅशनल प्रेसिडेंट आहेत.मो.९८८१६४३६५०)
समग्र भारतातील कामगारांची अवस्था फारच बिकट अशी होती यासंदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 15 ऑगस्ट 1938 रोजी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली या पक्षाचा जाहीरनामा टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी दैनिकाची छापण्यात आला स्वतंत्र मजूर पक्षाच्या अध्यक्षीय भाषणामध्ये मनमाड या ठिकाणी ते म्हणतात
“ब्राह्मणशाही व भांडवलशाही भारतीय कामगारांचे मोठे दोन शत्रू आहेत”
भारत भूमीतील थोर असे महात्मा फुले म्हणतात
“शेठजी भटजी व लाटजी हे या देशाचे खरे शत्रू आहेत”
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणतात “पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती श्रमिक कष्टकरी शेतमजूर कामगार यांच्या तळहातावर तरलेली आहे”
थोर कवी नारायण सुर्वे म्हणतात “कामगार आहे मी तळपती तलवार आहे
रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे
कधी फाटका बाहेर कधी फाटका आत आहे
सारस्वतांनो थोडासा गुन्हा करणार आहे”
वरील विवेचन सर्वार्थाने भारतीय अर्थव्यवस्था गतिमान करणे कामी कामगार वर्गाचे हित अधोरेखित होणे किती महत्त्वाचे आहे याचे वास्तव दिसून येत आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगार शेतकरी कष्टकरी हिताचे निर्णय व विधेयक पास करून त्यांना घटनेच्या तरतुदींमध्ये सामाविष्ट केले अशाप्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कामगारवर्गाचे एकमेव तारणहार नव्हे तर उद्धारकर्ते आहेत असे समजण्यात आज ही कामगार व शेतकरी ,महिला अंधारात आहेत हे मोठं दुर्दैव आहे.
शेतकऱ्यांसाठी किमान वेतन दर असावा अशी मागणी त्यांनी विधिमंडळात केली.
खोती पद्धत व कामगारांचे शोषण थांबवण्यासाठी बिल मांडले. कामगारांना संप करण्याचा कायदेशिर अधिकार मिळवून दिला.
सावकारी नियंत्रण विधेयक तयार केले.
मंत्रिमंडळात मजूर मंत्री असताना त्यांनी बरेच कायदे निर्माण केले या कायद्यातून कामगार हिताचे निर्णय करण्यात आला कामगार कल्याण योजना सेवा योजना कार्यालय भरपगारी रजा हे विधेयक 14 एप्रिल 1944 रोजी पास केले केले.
किमान वेतन कायदा 1948 ची निर्मिती झाली.
औद्योगिक कलह मिटवण्यासाठी लवादाची तरतूद केली .
भारतातील कामगार आयातीवर त्यांनी प्रतिबंध लागले.
महागाई भत्ता प्रसूतीच्या काळातील रजा कामावर गैरहजर असताना भरपगारी सुट्टी मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले.
कामाचे तास आठ तास करण्यासंदर्भात बिल मांडले.
कामगार भरपाई कायद्याची निर्मिती केली घटनेतील कलम 39 नुसार पगारदार पुरुषा इतकीच त्या पदावर कार्यरत असणाऱ्या स्त्रियांनाही तेवढाच पगार मिळावा ही तरतूद केली. कलम 43 नुसार शासनाने कामगारांचे जीवनमान सामाजिक व सांस्कृतिक संधी देण्याच्या उद्देशाने तरतूद केली. वेठबिगार हा गुन्हा आहे त्या संदर्भात कायदा केला.
अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कामगार विशेष धोरण कायदे शेतमजूर कष्टकरी महिला यांच्या वरती अनंत कोटी चे उपकार आहे हे आजमितीस आपणास डावलून चालणार नाही याकरता बाबासाहेबांचे कार्य त्यांचे विचार आचार हे समजून घेणे अनिवार्य आहे.
भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी भाकीत केले होते ब्राम्हणशाही व भांडवलशाही या देशाचे खरे शत्रू आहे. हे आज एकविसाव्या शतकामध्ये तंतोतंत लागू पडत आहे.
आत्ताच आपण आरबीआय आणि केंद्र सरकार यांनी देशातील गरीब उद्योगपतींना जाहीर केलेली कर्जमाफी आपण बघितली 68 हजार 607 कोटी रुपये रामदेव बाबा, विजय मल्ल्या, निरव मोदी, अशा पन्नास बड्या उद्योगपतींना कर्जमाफीचा लाभ या सरकारने दिलेला आहे.
या संकटाच्या पार्श्वभूमीवर आमचा कामगार या ठिकाणी पोटाचा प्रश्न, भुकेचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न, जीवनमरणाचा प्रश्न, उपेक्षित जगणं, आरोग्य आणि या सर्वांमध्ये रोजंदारी मधली होणारी उपासमार यामध्ये रोज मरतो आहे.
आमच्या शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचे बहुजनांचे वेदना व्यवस्थेला कळत नाहीये याचं मोठं दुर्दैव आहे.
म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मार्गदर्शक तत्वे घटनेतील तत्त्वे या सरकारने लागू करणे कामगार हिताचे धोरण राबवून शेटजी आणि भटजी यांना या देशाची लूट या श्रमिकांची लूट या लोकशाहीची होणारी लूट या शेतकऱ्यांची होणारी लूट आमच्या आयाबहिणींची बहिणीची अधिकाराची होणारी लूट थांबवावी लागेल अन्यथा येणारा काळ हा विदारक असेल बहुसंख्य समाज हा आजही दारिद्र्यात निपचीत पडलेला आहे या बहुसंख्य लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याकरता कामगार हिताचे धोरण कामगार आणि त्याचे कायदे त्याची योग्य अंमलबजावणी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले लोकशाहीर आण्णाभाऊ साठे या देशातील लोकराजा छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांच्या विचारानुसार रयतेचे राज्य आणि बहुजनांचे कल्याणकारी राज्य लोकशाहीच्या चौकटीतील एक मुहूर्तमेढ साध्य होणारे राष्ट्र आम्हास घडवावे लागेल याकरिता लोकशाहीचे बाळंतपण तुम्हाला व आम्हाला करावे लागेल हेच आज जाणवत आहे.
#repost