दिनांक 25 एप्रिल रोजी शाहीर राजेंद्र कांबळे यांचे वडील सोपान कांबळे यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले यावेळी राजेंद्र कांबळे यांचा शाहिरी चा कार्यक्रम अक्कलकोट येथे सुरू होता वडिलांच्या मृत्यूची बातमी कळली तरीही राजा कांबळे यांनी कार्यक्रम सुरूच ठेवला.
थोर समाज सुधारक गाडगे बाबा यांनी समाज प्रबोधन चालू असताना स्वतःच्या मुलाच्या मृत्यूची बातमी कळाली तरीही आपले समाजप्रबोधन चालूच ठेवले आणि उपस्थितांना म्हणाले असे मेल्या कोट्यानुकोटी काय रडू एकासाठी त्या समाजसुधारकाचा वसा घेत आज 26 एप्रिल रोजी 15 सेक्शन जांबुड या ठिकाणी राजेंद्र कांबळे यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे याप्रसंगी राजा कांबळे म्हणाले माझे समाज प्रबोधन मेलेल्या माणसासाठी नसून जिवंत माणसाला परिवर्तन करण्यासाठी आहे म्हणून अक्कलकोट 15 सेक्शन येथील मिळालेले मानधन आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांसाठी वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त दान करणार आहे शाहीर राजेंद्र कांबळे खुडुसकर