गेल्याआठवड्यात राज्यात भारनियमन होणार नाही, असे आश्वासन नितीन राऊत यांनी दिले होते. परंतू आता परिस्थिती बदलली आहे, असे ते म्हणाले .आणि आता राज्यात भारनियमन होणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.
🔅भारनियमन कधी संपेल…
राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सांगितले, हे भारनियमन कधी संपेल हे सांगता येणार नाही.यामुळे नागरिकांनी वीजेच्या वापरावर काटकसर करावा. तसेच भारनियमनाचे वेळापत्रक प्रसिद्ध केले जाईल.
तुम्हाला मेसेज, व्ह़ॉट्सअप द्वारे कळवू असेही त्यांनी सांगितले. तसेच आम्हाला जर १५०० मेगावॅट वीज कुठूनही मिळाली तर आम्ही भारनियमन रद्द करू असे ही ऊर्जा मंत्री म्हणाले.