माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथील सदाशिव देठे निवासी प्रशाला व ज्यू कॉलेज मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा आज शेवटचा पेपर होता व त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बहुजन मुक्ती पार्टी चे राज्य कार्यकारणी सदस्य काकासाहेब जाधव म्हणाले “ग्रामीण भागातील ही शाळा म्हणजे आदर्श विदयार्थी आदर्शवत असे उदाहरण आहे.महाराष्ट्र मधील मुलांना बारावी पर्यंत येथे दर्जेदार शिक्षण मिळणार आहे.स्पर्धा परीक्षा,नीट,जेईई अशा परीक्षाची सोय होणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष रिपाई तालुका सरचिटणीस मिलिंद सरतापे म्हणाले “या शाळेतील विद्यार्थी आय ए एस,आय पी एस,न्यायाधीश व महत्वाच्या पदावर आरूढ होतील.”
संस्थापक चेअरमन डॉ.कुमार लोंढे म्हणाले मुलांनी पाचवी ते बारावी पर्यंत निवासी प्रवेश घ्यावेत.आपल्या मुलांना योग्य शिक्षण, गुणवत्तापूर्ण शिक्षण याची 100% हमी आम्ही घेतोय.गेली सात वर्षे दहावी व बारावीचा निकाल 100% आहे तेव्हा आमच्यावर विश्वास टाकून बघा शंभर रु च्या स्टॅम्प वर लिहून देतो तुमचा पाल्य तुम्ही जगाच्या स्पर्धेत अग्रक्रमी असाल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.तर मराठा समाजाच्या व मातंग समाजाच्या युवकास अकरावी व बारावी साठी दत्तक घेण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्य साठे सर यांनी केले.कार्यक्रमास संस्थेच्या सचिव डॉ.पंचशीला लोंढे,सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक कवळे साहेब,निवृत्त मेजर कांबळे साहेब,शाळा समिती चे जितेंद्र देठे,अध्यक्ष बाळासाहेब जाडकर,केपीजेएस नागरी बँक चे संचालक माणिक मगर पाटील,निमगाव चे नाना मगर इ प्रमुख पाहुणे उपस्थित होते
तर सदर कार्यक्रम आयोजन प्रा.राजेश वायदंडे,प्रा.धाइंजे,प्रा.नितीन सरक,प्रा अल्ताफ पठाण ,अरुणा म्याडम,माया म्याडम इ नी केले होते.या प्रसंगी विद्यार्थ्यांनी शाळेप्रति आभार व्यक्त करून सर्व शिक्षक व मान्यवरांचा सत्कार केला.