प्रतिनिधी : युवराज नरुटे (9011394020)
तृतीयपंथी ओळख दिनानिमित्त तृतीयपंथी यांसाठी दि. २७ मार्च ते दि. २ एप्रिल २०२२ या कालावधीत मतदार नोंदणीचा विशेष सप्ताह साजरा करण्यात येत असून त्यानिमित्ताने मतदार नोंदणीसाठी तहसील कार्यालय, माळशिरस येथे विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
जगभरात ३१ मार्च हा दिवस तृतीयपंथी ओळख दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने २५४ माळशिरस (अ.जा.) विधानसभा मतदार संघांमध्ये तृतीय पंथीयांची मतदार नोंदणी करण्यात येणार असून त्याकरिता त्यांच्याकडील कागदपत्रांची कमतरता लक्षात घेऊन मा. राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी त्यांना कागदपत्रांबाबत सवलत देऊ केली आहे.
वय वर्ष १८ पूर्ण असलेले तृतीयपंथी नागरिकांकडे वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड, रेशन कार्ड, शाळेचा दाखला, जन्म दाखला ग्राह्य धरण्यात येईल. तसेच नाव नोंदणीसाठी दि. ३०/३/२०२२ रोजी तहसील कार्यालय माळशिरस येथील मिटिंग हॉलमध्ये सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी अधिकाधिक तृतीयपंथी नागरिकांनी मतदार नोंदणी करावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज व तहसीलदार माळशिरस यांनी केले आहे.
या शिबिरादिवशी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी २५४ माळशिरस (आ.जा.) विधानसभा मतदार संघ तथा तहसीलदार जगदीश निंबाळकर, निवडणूक नायब तहसीलदार आर. बी. भंडारे, अव्वल कारकून ही. बी. लोखंडे, अव्वल कारकून पुरवठा आ. जी. वाघमारे, अव्वल कारकून संगायो पी. टी. शिंदे, महसूल सहाय्यक निवडणूक डी. एस. काळकुटे, निवडणूक ऑपरेटर मलिक इनामदार,तरंगफळ गावचे महाराष्ट्रातील पहीले तृतीयपंथी सरपंच माऊली कांबळे प्रहार संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष तथा स्व. राजमाता रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बहुउद्देशीय दिव्यांग संस्था तरंगफळचे गोरख जानकर, नाना कर्चे, दत्ता कचरे ,ज्योतीताई कुंभार आदी अधिकारी उपस्थित आहेत.