माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथे आद्यक्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.सुरुवातीस प्रतिमेचे पूजन सेंट्रल ह्यूमन राईट चे अध्यक्ष डॉ.कुमार लोंढे,बोडरे गुरुजी,के.के ग्रुपचे केशव कोपनर,जय मल्हार चे अरुण बोडरे यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रम प्रसंगी डॉ.कुमार लोंढे म्हणाले “उमाजी राजे हे फक्त रामोशी समाजाचे नसून संपूर्ण बहुजन समाजाचे राजे होते त्यांचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज होते.त्यांनी इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा उभारला होता कॅप्टन राबर्टसन याला भीती होती की शिवाजी महाराज सारखे स्वराज्य निर्माण करू नये.कपटनीती चा वापर करून दहा हजार पैज व दोनशे एकर जमीन इनाम मिळवण्यासाठी कुलकर्णी सारख्या व्यक्तींनी स्वकियासी गद्दारी केली हा इतिहास विसरून चालणार नाही त्यामुळे रामोशी समाजाने कुऱ्हाडीला धार लावण्यापेक्षा बुद्धीला धार लावावी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्या उक्तीप्रमाणे मोक्याच्या माऱ्याच्या जागा पटकाव्यात हीच आमच्या राजाला खरी श्रद्धांजली ठरणार आहे असा आशावाद त्यांनी व्यक्त केला”.यावेळी बोडरे गुरुजी यांनी ही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास नामदेव बोडरे,महादेव मिसाळ, शाहिद शेख,हंबीरराव जाधव,अमोल मगर,विकास बोडरे,शिवाजी पाटोळे,विकास गोडसे,रंगनाथ सरक इ मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.शेवटी आभार अरुण बोडरे यांनी मानले