माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथे सदाशिवराव देठे निवासी प्रशाला व ज्यू कॉलेज ,डायमंड इंग्लिश स्कूल मध्ये प्रमुख पाहुणे जितेंद्र देठे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .कार्यक्रमाचे अध्यक्ष मेजर शिवाजी कांबळे होते.
संस्थापक डॉ.कुमार लोंढे म्हणाले मुलांची गुणवत्ता,त्यांचा सर्वांगीण विकास,स्पर्धा परीक्षा,चिकित्सक शिक्षण काळाची गरज आहे. विदयार्थी व शाळा मोठी करण्यासाठी शिक्षक यांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत. प्राचार्य कुंडलिक साठे म्हणाले मी ,सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्या एकोप्याने शाळा नक्कीच मोठी करणार असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी कोरोनाचा वाढता धोका पाहता अस्तित्व संस्था सांगोला व सोशल संस्था यांच्या विद्यमाने मास्क,सॅनिटायझर व मोफत वह्या वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास संस्थेच्या सचिव डॉ.पंचशीला लोंढे,प्रा.पठाण,प्रा.धाइंजे,समाधान खरात,विद्यार्थी, पालक इ मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रा.नितीन सरक यांनी केले तर शेवटी आभार प्रा.राजेश वायदंडे यांनी मानले.
education.com Malshiras – MH-45 शाळा.
Varsha Gaikwad आपल सोलापूर Kumar Londhe – कुमार लोंढे Admission