माळशिरस तालुक्यातील
सदाशिवराव देठे निवासी प्रशाला व ज्यु काॅलेज चांदापूरी (माळशिरस) सोलापूर येथे संविधान दिन साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे आयोजन डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका व संशोधन केंद्र,दलित फाऊंडेशन दिल्ली,सेंट्रल ह्यूमन राईट संघटन दिल्ली यांचे वतीने करण्यात आले होते.प्रथम संविधान प्रतिमेचे व महामानव ,घटनाकार,भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन प्रशालेचे मुख्याध्यापक प्रा.साठे के एस यांच्या हस्ते करण्यात आले. संविधानाचे प्रस्तविकचे सामुदायिक वाचन करण्यात आले.
“या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून बोलताना प्रा.साठे म्हणाले,संविधान म्हणजे राष्ट्रग्रंथ,स्वातंत्र्य,समता ,बंधुता,
न्याय,समानता याचा अंगीकार होणे महत्त्वाचे आहे आणि याची जबाबदारी युवक वर्ग व विद्यार्थी वर्गावर जास्त आहे. नैतिकता ,शील,कर्तव्य व जबाबदारी हे आपल्या आचरणात आणायचे असतील तर संविधान वाचायला हवे तरच सुजान , जबाबदार,कर्तव्यदक्ष नागरिक निर्माण होईल म्हणून संविधानाची जनजागृती महत्त्वाची आहे”
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.नितीन सरक यांनी केले.सविधान प्रस्तविकेचे वाचन इ.7वी ची विद्यार्थ्यांनी कु.अक्षरा लोंढे केले.यावेळी ,प्रा.अल्ताफ पठाण, प्रा.विठ्ठल धाइंजे, इ उपस्थित होते शेवटी आभार प्रा.वायदंडे सर यांनी केले.