ST महामंडळाचे विलिनीकरण राज्य शासनात व्हावे व ST कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे निकष देण्यात यावेत यासाठी संपावर गेले आहेत. मागील भाजपा सरकारने ST कर्मचाऱ्यांना आश्वासनाचे गाजर दाखवुन सत्तेत आल्यावर वाऱ्यावर सोडले व त्याचप्रमाणे सध्याच्या महाभकास आघाडी सरकारला सुद्धा ३२ कर्मचाऱ्यांनी या मागणीसाठी स्वतःचे जीवन संपविल्या नंतरही अजुनही जाग येत नाहीये. सरकार कर्मचारी वर्गाच्या हक्कांची जबाबदारी झटकून पूर्णतः असंवेदनशील झाल्याचे दिसुन येत आहे. यामुळे अतिशय हालाखीच्या परिस्थितीतुन जात असलेला ‘लाल परी’ चा कामगार वर्ग मागण्या मान्य होईपर्यंत संपावर गेला आहे. या कर्मचाऱ्यांना स्वतःचे हक्क मिळवून देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आदरणीय ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वंचितच्या प्रभारी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी या आंदोलनाला पाठिंबा देऊन कर्मचाऱ्यांसोबत राहण्याचा आदेश दिला आहे त्यानुसार आज अकलूज आगारात सुरू असलेल्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी माळशिरस तालुक्याच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला व वंचित आघाडी आपल्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा असल्याचे आश्वासन दिले. तसेच आंदोलनकर्त्यांनी मांडलेल्या तक्रारीवरून वंचितच्या वतीने आगारप्रमुखांना संविधानिक मार्गाने व शांततेने स्वतःच्या हक्कांसाठी शांततेत आंदोलन करीत असलेल्या आंदोलकांवर कोणत्याही प्रकारे दबाव टाकू नये अन्यथा वंचित बहुजन आघाडी माळशिरस तालुक्याच्या वतीने कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल असा ईशारा देण्यात आला.
✍️अभिजीत गायकवाड
📞९८९०१७१०८७
(वंचित बहुजन आघाडी माळशिरस तालुकाध्यक्ष)