अकलूज येथे गेली तेरा वर्षांपासून कार्यरत असलेले अल्केमिस्ट स्पोकन इंग्लिश व पर्सनॅलिटी डेव्हलपोमेंट ट्रेनिंग सेंटर या संस्थेला ISO (INTERNATIONAL STANDERD ORGANIZATION ) नामांकन मिळाले आहे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील पहिला आणि एकमेव ISO Certified होण्याचा बहुमान क्लासला मिळालेला आहे.
यावेळी संचालक प्रताप वाघमोडे जनविद्रोही प्रतिनिधी बरोबर बोलताना म्हणाले की,गेली तेरा वर्ष ट्रेनिंग देण्याचे काम करत असताना आमच्या अनेक विध्यार्थ्यानी त्यांच्या करिअर मध्ये यश मिळवले आहे व राज्य तसेच देश पातळीवर चांगले जॉब मिळवून अल्केमिस्ट संस्थेचे तसेच आपल्या जिल्ह्याचे नाव लौकिक केले आहे.
अकलूज तसेच सोलापूर जिल्ह्यातील लाखो विध्यार्थ्यांना स्पोकन इंग्लिश तसेच
पेर्सनॅलिटी डेव्हलोपमेंट इंटरव्हिव्ह स्किल्स
कम्युनिकेशन स्किल्स
ग्रुप डिस्कशन
कॉन्फिडन्स बिल्डिंग
इत्यादी सर्व स्किल्स चे ट्रेनिंग देत आलो आहोत महाराष्ट्र भर अल्केमिस्ट हे सुरू आहे
हे सर्व शक्य होत आहे ते केवळ सर्वांचे प्रेम व आशीर्वाद असल्यामुळेच असे ही ते म्हणतात.
त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होताना दिसत आहे.