350 मालिकांमध्ये केले होते काम.
मुंबई – चक्रधर मेश्राम दि 3 आक्टोबर 2021:-
तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेमध्ये काम करणारे घनशाम नायक उर्फ नट्टू काका यांची प्राणज्योत मावळली होती. मागील काही महिन्यात त्यांना कॅन्सर झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्यांची तब्येत बिघडत गेली. अखेर त्यांनी आज रविवारी प्राण सोडले आहेत.
तारक मेहता मालिकेच्या माध्यमातून ते सगळीकडे प्रचलित होते. त्यांच्या जाण्याने चाहत्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच तारक मेहता मालिके सह चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. घनशाम नायक यांनी तारक मेहता सह 350 हून अधिक मालिकांमध्ये काम केले आहे.
कॅन्सर झाला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांची कॅन्सरशी झुंज अयशस्वी ठरली आणि त्यांची प्राणज्योत मावळली आहे. अनेक बड्या सेलिब्रिटींनी नट्टू काका यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली अर्पण केली आहे.