लातूर जिल्ह्यातील कु.”ऐश्वर्या सुशील चिकटे”, हिची निवड होणे हे भूषणावह आहे कारण या विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे विशेष वारसा असून हे विद्यापीठ जागतिक कीर्तीचे आहे
कु ऐश्वर्या व तिचे कुटुंब सिद्धार्थ सोसायटी, लातूर येथे वास्तव्यास आहे.”भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर” ज्या “लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स” विद्यापीठामध्ये शिक्षण घेतले त्या विद्यापीठा मध्ये निवड झाली आहे, गेल्या पाच वर्षात एकाही भारतीयाला या विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्याची संधी प्राप्त झाली नाही प्रचंड अभ्यास, खूप मेहनतीच्या जोरावर ही संधी ऐश्वर्या हिला मिळाली आहे.नक्कीच ही अभिनंदननिय बाब आहे .
तीच्या या शैक्षणिक प्रवासास सोशल संस्था, सदाशिवराव देठे निवासी प्रशाला व ज्यू कॉलेज ,सेंट्रल ह्यूमन राईट,किपीजेएस नागरी बँक ,अंकुर चॅरिटेबल हॉस्पिटलम व जनविद्रोही न्यूज परिवार तसेच या संस्थेचे सर्वेसर्वा डॉ.कुमार लोंढे यांच्या वतीने ही अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा
ग्रामीण भागातील मुले,मुली यांनी या मुलीचा आदर्श घ्यावा व उचशिक्षणासाठी सज्ज राहावे आम्ही सुद्धा असे विद्ववत विदयार्थी संस्थेचे मार्गदर्शक डॉ.कुमार लोंढे सर्व संचालक,व शिक्षक पालक यांच्या सहकार्याने शिक्षणास सज्ज व टॉप चे विद्यार्थी घडवणार आहोत
–प्रा.कुंडलिक साठे
प्राचार्य सदाशिव देठे प्रशाला व ज्यू कॉलेज चांदापुरी ता.माळशिरस सोलापूर