मुंबई दि. 30 – छत्रपती शिवाजी महाराज यांचे 14 वे वंशज किरणराजे भोसले यांची रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी अधिकृत निवड करण्यात आल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी आज केली.त्याबाबतचे नियुक्तीपत्र आज ना.रामदास आठवले यांच्या हस्ते किरणराजे भोसले यांना प्रदान करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे 14 वे वंशज असणारे किरणराजे भोसले हे नाशिक येथे वास्तव्यास असून रिपाइं चे नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी त्यांचे रिपाइं मध्ये स्वागत केले आहे. मुंबई मालाड तालुका अध्यक्ष सुनील गमरे यांनी किरणराजे भोसले यांची रिपाइं च्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणसाठी केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी सर्वप्रथम समर्थन देणारी आश्वासक भूमिका घेतली.सर्व प्रथम लोकसभेत मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणीही केली. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी ना रामदास आठवले यांचा मराठा समाजातील आर्थिक दुर्बल समाजाला नेहमी पाठिंबा राहिला असल्याने आपण ना रामदास आठवलेंच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला असल्याचे किरणराजे भोसले यांनी सांगितले आहे.