तफिसा इंटरनॅशनल संस्था यांच्यामार्फत जगभरामध्ये 96 राष्ट्रा मध्ये वर्ल्ड वॉकिंग डे साजरा केला जातो .ही संस्था आशिया ;इंडिया आणि ऑल महाराष्ट्र असोसिएशन ऑफ स्पोर्ट्स फॉर ऑल यांच्याशी संलग्न असून महाराष्ट्र राज्य सोलापूर असोसिएशन फॉर स्पोर्टस् फॉर ऑल संस्था संलग्न झाली आहे.
तफिस|ची स्थापना 1960 साली जर्मनि मध्ये झाली .ही संस्था युनेस्को; डब्ल्यू एच ओ; इंडियन ऑलिम्पिक कमिटी यांच्याशी संलग्न आहे .या संस्थे मार्फत कार्यक्रम आयोजित करण्या चा मान असोसिएशन ऑफ स्पोर्टस फॉर ऑल सोलापूर या संस्थेला मिळाला आहे अशी माहिती या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्रमोद कसबे यांनी दिली. सदर कार्यक्रम मध्ये सोलापुरातील सर्व नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आव्हान संस्थेमार्फत डॉक्टर प्रमोद यांनी केले .या संस्थेच्या उभारणीत मोलाचे साथ महाराष्ट्र स्पोर्ट फॉर ऑल चे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब चिंचकर यांनी केली .सदर कार्यक्रमास संपदा जोशी; विजय गायकवाड ;देवेंद्र आवटी; विजय जाधव;मनीष लिंबोळी; वसीम शेख; कल्पना भोसले ; कुणाल नागमोड यांची तसेच सर्व कराटे स्पोर्ट्स विद्यार्थ्यांची मत मिळाली सदर कार्यक्रम हा हा 3 ऑक्टोबर 2019 रोजी श्री सिद्धेश्वर महाराज मंदिर गणपती घाट या ठिकाणी सकाळी सात ते नऊ या वेळेत होणार आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा