प्रतिनिधी चांदापुरी/माळशिरस
माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथील सोशल संस्था संचलित सदाशिव देठे निवासी प्रशाला व ज्यू कॉलेजचा सालाबादप्रमाणे या ही वर्षी दहावी व बारावीचा निकाल शंभर ( १००%) लागल्याने पालक विदयार्थी व ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
या शाळा व कॉलेजच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुले व मुली यांना दर्जेदार शिक्षणाबरोबर ,सर्वांगीण विकास,कौशल्य,स्पर्धा परीक्षा, स्कॉलरशिप अशा माध्यमातून नाविन्यपूर्ण शिक्षण देण्याचा प्राध्यापक व शिक्षक यांचा मानस असतो.
या वर्षी विज्ञान शाखेत मुलींनी बाजी मारली आहे.प्रथम क्रमांक- मगर निकिता विजय (८२.३३%) द्वितीय क्रमांक- मगर शीतल रमेश (८१.००%) तर तृतीय क्रमांक-खरात अश्विनी अंकुश ( ८०.८३) हिने मिळविला. विशेष प्राविण्य -मगर अमृता नानासो(८०.५१%) व पवार प्रियांका संजय (८०.३३%) या दोन मुलींनी मिळवले.कला शाखेत प्रथम क्रमांक -आसबे ऋषीकेश राजकुमार (७४.६६%) द्वितीय क्रमांक- चव्हाण बबलू पतींग (७४.१६%) तृतीय क्रमांक- निकम पांडुरंग अनंत (७३.००%) यांनी मिळवला. एकूण सत्तेचाळीस ( ४७) विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी नऊ (९) विद्यार्थी खाजगी (१७ नंबर) होते.यामध्ये ऐंशी टक्केच्या वर विज्ञान चे सहा विद्यार्थी तर बाकीचे विद्यार्थी प्रथम श्रेणीत पास आहेत.
सदरचे शिक्षण संकुल उभा राहिल्याने विशेषतः मुलींचे बालविवाह थांबले व ग्रामीण,डोंगराळ मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध झाल्याने दुष्काळग्रस्त पाल्याना स्वतःच्या पायावर उभा राहण्यास सक्षम पर्याय ही संधी आहे.
संस्थेने या वर्षी कोरोना काळात समाजाच उतरदायित्व म्हणून राजश्री शाहू महाराज व अहिल्यामाई होळकर मुले दत्तक योजना चालू केली आहे या योजनेत गरीब ,गरजू व मागास जातीतील मुलांना मोफत प्रवेश मिळणार आहे.जर कोणी दानशूर व्यक्तीं,पालक यांना मुले दत्तक योजनेत सहभाग व शाळेस मदत करायची असेल तर आपण ही खारीचा वाटा उचलावा असे आव्हान संस्थेच्या वतीने केले आहे
दहावी व बारावी चांगल्या गुणांनी पास झालेल्या सर्वांचे विशेष अभिनंदन संस्थेचे संस्थापक डॉ.कुमार लोंढे सचिव डॉ पंचशीला लोंढे यांनी केले तर शाळा व्यवस्थापन समितीचे नानासो मगर,बाळासो जाडकर,जितेंद्र देठे, मेजर कांबळे यांनी सर्व विद्यार्थी,शिक्षक,प्राध्यापक यांचे कौतुक करून ग्रामीण भागात शाळा नावलौकीक करेल असा आशावाद व्यक्त केला.
शंभर टक्के निकाल लावल्याबद्दल प्राचार्य कुंडलिक साठे,विज्ञान विभाग प्रमुख प्रा.नितीन सरक,प्रा.दीपक काटे कला विभाग प्रमुख प्रा.अल्ताफ पठाण व वायदंडे सर,धाइंजे सर ,कारकून सागर फडतरे यांचा संस्थाप्रमुख, संचालक व शाळा समितीने सत्कार करून शुभेच्छा दिल्या.