मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि 2 आगष्ट 2021:-
लॉकडाउन आणि कडक निर्बंधामुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली असून नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगारांना फसवण्याच्या घटना वाढल्या आहेत. अशाचप्रकारे ॲक्सिस बँकेत नोकरी लावण्याच्या भूलथापा देऊन शेकडो तरुण-तरुणींची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पायधुनी पोलिसांनी भांडाफोट केला आहे. याप्रकरणी एका महिलेसह तिघांना अटक करण्यात आली आहे.
https://youtu.be/tAb_-4mIC6k
👆 लिंक वर टच करून व्हिडीओ पहा व आवडल्यास शेअर करा
⭕ऑक्सिजन पातळी घरच्या घरी कशी चेक करावी
बोगस कॉल सेंटर थाटून हे सर्वजण बेरोजगारांना गंडा घालत होते.
पायधुनीमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या एका महिलेला अनोळखी तरुणाचा फोन आला. नोकरी डॉट कॉममधून बोलत असल्याचे सांगत ॲक्सिस बँकेत नोकरीभरती सुरू असल्याचे तो म्हणाला. बँकेत नोकरी मिळत असल्याने या महिलेने तयारी दाखवली. नोकरी डॉट कॉमप्रमाणे हुबेहूब तयार करण्यात आलेल्या ई-मेल आयडीवर महिलेने स्वतःचा वैयक्तिक तपशील पाठवला. यानंतर नोंदणीशुल्क, मुलाखतशुल्क, पोलिस पडताळणी अशी वेगवेगळी कारणे सांगून या महिलेकडून एक लाख ३८ हजार रुपये उकळण्यात आले. पैशाची मागणी थांबत नसल्याने महिलेला संशय आला आणि तिने दिलेले पैसे परत मागितले. यावर समोरच्या व्यक्तीने संपर्कच तोडला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने पायधुनी पोलिस ठाण्यात तक्रार केली.
पायधुनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष दुधगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक करीम शेख, अनंत साळुंखे, सहाय्यक निरीक्षक निलेश बनकर यांच्यासह पोलिसांच्या पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक पुराव्यांवरून ही टोळी उत्तर प्रदेशातील नोएडा शहरात कार्यरत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी दिल्ली गाठून कैलाश रामचंद, सतीशकुमार कल्याण सिंग आणि गीता सिंग यांना अटक केली. या ठिकाणी खोली भाड्याने घेऊन या टोळीने कॉल सेंटर थाटले होते.
फसवणुकीचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून त्यात
पोलिसांनी या आरोपींकडून १४ मोबाइल, आठ सीमकार्ड, तीन लॅपटॉप, २५ एटीएम-डेबिट कार्ड, दोन पॅनकार्ड, सहा आधारकार्ड, बँकेची १४ नियुक्ती पत्रे, चार पासबुक, नऊ चेकबुक तसेच इतर साहित्य जप्त केले. ही टोळी ऑनलाइन पैसे स्वीकारण्यासाठी बोगस ओळखपत्रांच्या आधारे काढण्यात आलेल्या बँक खात्याचा वापर करीत असल्याचे तपासातून समोर आले आहे.