अपंग युवक रुपम ला केली पोलिसांनी मारहाण..?
गडचिरोली: विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि 22 जुलै 2021 :-
आरमोरी येथील सद्गुरू किराणा स्टोअर्स चे मालकिनची प्रकृती ठीक नसल्यामुळे, रुपम विनयकुमार जुवारे, वय 23 वर्ष तो अपंग असून दुकान दिवसभर सुरु करून वेळ होताच बंद केल्यावर, दुकानापुढे आरमोरी येथील पोलीस स्टॉप चालक बीके व पोलीस नाईक अकबर पोयाम गाडी सहित आले, दिगंबर सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक, यांनी गोदामाची चावी घेऊन बोलाविले असे सांगितले, असता दुकानाचे मालक हजर नाही ते स्वतःच्या प्रकृतीची तपासणी करीता गोंदिया येथे दवाखान्यात गेले आहेत, तसेच गोदामाची चावी मालका कडेच आहे व मी जेवण करून थोड्या वेळात साहेबांची भेट घेण्याकरता येतो,
अशी विनवणी केली असता थोड्या वेळातच चेतनसिंग चव्हाण,सहाय्यक पोलीस निरीक्षक, व वैरागड पोलीस पाटील भानारकर हे बंद दुकानापुढे आले, व सदर युवकाची कॉलर पकडून अरेरावीची भाषा वापरून जोराने शिवीगाळ देऊन गळफास लागेल अशाप्रकारे गाडीकडे मारहाण करीत नेले, सदर युवक अपंग असल्याचे सांगत, माझा गुन्हा काय आहे? , माझ्याबद्दल वारंट आहे का? ,असं म्हटले असतांना पुन्हा मारायला सुरुवात केली? असे असतांना तेवढ्यात बंद दुकानापुढे काही पोलीस स्टॉप, राठोड नायब तहसीलदार, पटवाळी , नगर परिषद कर्मचारी असा एकूण पंधरा ते वीस कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित झाले,वरील कृत्य डोळ्याने बघून कु. नेहा विनयकुमार जुवारे ( ,सदर युवकाची बहीण ) भावाच्या रक्षणासाठी त्याला मारू नका त्याने काहीच केले नाही त्याची कार्यवाही बाबत आपणाकडे वारंट आहे का ? अशी विचारणा केली आणि सदर मारहान बद्दल तिने व्हिडिओ शूटिंग केली तेव्हा तिच्या जवळचा मोबाईल एपिआय. चव्हाण यांनी नेहा हिचा हात धरून मारहाण करून मोबाईल हिसकावून घेतला व त्यामधील शूटिंग लगेच डिलीट केली त्या वेळेस त्या ठिकाणी कोणतीही महिला पोलिस अधिकारी कर्मचारी उपस्थित नव्हते, तेवढ्यात लोकांचा जमाव जमलेला असताना लगेच पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, बंद दुकानापुढे आले,आणि कोणताही गुन्हा नसताना जबरदस्तीने अरेरावी करून शिवीगाळ करत मारहाण केली, व पोलिसांच्या मदतीने मारत मारत गाडीत बसविले व पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेल्यावर पोलिसांनी रूममध्ये लाथा बुक्क्यांनी मारहान केली, कोणतीही चूक किंवा गुन्हा नसतांना पीआय सूर्यवंशी, चव्हाण सपोनि, यांनी अमानुषपणे मारहाण केली, पैशाचीही मागणी केली असता पैसे न दिल्यामुळे, जाणून बुजून हेतुपुरस्परपणे त्यांनी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून कलम 353, 34,188,272,273, भादंवि, दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून वरील प्रमाणे सर्व बाब दुकाना समोर जमलेल्या लोकांनी बघितले व मोबाईल वर शूटिंग सुद्धा घेतली आहे वरील पोलीस कार्यवाही हे अन्यायकारक असून, कार्यवाहीमुळे व्यापारी वर्गात आणि समाजात, जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे, जाणून-बुजून अशाप्रकारे खोटी कार्यवाही करण्यात आलेली आहे,करिता वरील प्रमाणे सर्व प्रकारचे मनमानी आणि जबरदस्तीने मारझोड करणाऱ्या अधिकारी यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने आम्ही दि 03 जुलै रोजी विष प्राशन जरून आत्मदहनाचा प्रयत्न केला परंतु, पोलिस निरीक्षक यांनी उपजिल्हा सामान्य रुग्णालय आरमोरी, येथे भरती करून डॉक्टरांनी औषधोपचार केला परंतु 4 जुलै रोजी प्रकृती चिंताजनक असल्याने तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भरती करण्यात आले होते, परंतु आज पावेतो संबंधित अधिकाऱ्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याचे दिसून आल्याने आणि योग्य न्याय मिळाला नसल्याने दि. 21 जुलै पासून जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे समोर बेमुदत आमरण उपोषण करीत असल्याचे माहिती दिली आहे.