मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि.11 जुलै 2021:-
केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार, प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न दिल्यामुळे नाराज झालेल्या बीड जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे देत आपली नाराजी व्यक्त केली आहे. राजीनामे देणार्या पदाधिकाऱ्यांना पंकजा मुंडे नेमकं काय आवाहन करतात..? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद न दिल्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय सचिव, पंकजा मुंडे या जरी आपण नाराज नसल्याचे सांगत असल्या तरी, देखील बीड जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे देण्याचा निर्णय घेतला आहे.या पदाधिकार्यांमध्ये सरचिटणीस, सर्जेराव तांदळे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, सुनीता बडे पंचायत समिती सदस्य, प्रकाश खेडकर यांच्यासह जवळपास वीस पदाधिकार्यानी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. खासदार, प्रीतम मुंडे यांना डावलून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात राज्यसभेचे सदस्य, भागवत कराड यांना संधी दिल्यामुळे, मुंडे भगिनी व समर्थकांच्या मध्ये नाराजी असल्याचे दिसत आहे.
मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर दोन दिवसांनी पंकजा मुंडे यांनीही आपले मन सोडलेलं नाही. या पदाधिकाऱ्यां पैकी काही पदाधिकाऱ्यांनी याला, देवेंद्र फडणवीस हेच कारणीभूत असल्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. या संदर्भात पंकजा मुंडे यांनी अखेर शुक्रवारी माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका मांडत असताना सांगितले की, पक्षाने घेतलेला निर्णय आपल्याला मान्य आहे, या निर्णयावर आपण नाराज नाही. मात्र बीड जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितले आहे की, पंकजा मुंडे या निर्णयासंदर्भात नाराज नसल्या, तरी ही आम्ही नाराज असून आमच्या पदाचे राजीनामे देत आहोत.
आज शनिवारी, जिल्हा परिषद सदस्य, सविता बडे पंचायत समिती सदस्य, प्रकाश खेडकर आणि भाजपा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष, संग्राम बांगर, भटके-विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष, डॉ. लक्ष्मण जाधव, भाजप जिल्हा उपाध्यक्ष, संजय सानप, समाज माध्यम प्रमुख, अमोल वडतीले, तालुकाध्यक्ष, महादेव खेडकर, भाजप युवामोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष, विवेक पाखरे यांच्यासह २० पेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे जिल्हाध्यक्ष, राजेंद्र मस्के यांच्याकडे सोपवली आहेत.