भंडारा, विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम.दि.१० जुलै २०२१
करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशातील १८ पेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व नागरिकांना लस दिल्या जात आहे. विद्यार्थ्यांना लस मिळणे आवश्यक होते. तशी यंत्रणा भंडारा जिल्ह्यातील आरोग्य विभागातर्फे सज्ज आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेऊन हे लसीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्या सरिता निंबार्ते यांनी विद्यार्थ्यांना केले. धारगाव आरोग्य केंद्रात त्यांनी स्वतः लास घेतली. आगामी शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू करण्यात येणार असून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. सर्व परीक्षा घेत असताना एकही विद्यार्थी करोना बाधित होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात येईल. विद्यार्थ्यांचे आरोग्य हे सर्वांच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
डॉ कैकाडे यांनी सुद्धा नागरिकांना लसीकरण करण्यासंदर्भात आवाहन करतांना म्हणाले कि, कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी सर्वांनी लस घेणे गरजेचे आहे. लस हेच सुरक्षा कवच आहे. त्यामुळे सर्वांनी लस घ्यावे. १८ ते पुढील वयोगटातील व्यक्तींचे धारगाव आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू आहे. जिल्ह्यात लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही लस अत्यंत सुरक्षित आहे. लस घेतल्यामुळे आपल्याला कोणताही शारीरिक त्रास किंवा इजा होत नाही. त्यामुळे लसीबद्दल कोणीही आपल्या मनात शंका ठेवू नये किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन डॉ कैकाडे यांनी केले आहे. यावेळी प्रामुख्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्या सरिता निंबार्ते, डॉ कैकाडे, श्रीधर काकिरवार, तुलना बडोले, रामेश्वरी धुर्वे, सुप्रिया ठावकर, गौरी वंजारी, सोनाली भेलावे, दीपाली मेहर, सावी निंबार्ते, युवा पदवीधर महासंघाचे साहिल किंदर्ले, दिनेश वंजारी यावेळी उपस्थित होते.