भंडारा, विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दिनांक ६ जुलै २०२१
ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण या राज्यातील आघाडी सरकारच्या नाकर्तेपनामुळे व ओबीसी विरोधी धोरणामुळे रद्द झाले. ओबीसी समाजाला त्यांचे रदद् झालेले आरक्षण राज्य सरकारनी त्वरित परत मिळवून देण्याकरिता प्रामाणिक प्रयत्न करावे व सरकारनी सभागृहात ओबीसीच्या राजकीय आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी या मागणी करीता काल दिनांक 5 जुलै 2021 रोजी विधानसभेच्या सभागृहात भारतीय जनता पार्टीच्या 12 लढवैय्या आमदारानी हा विषय लावून धरत असताना सत्ताधारी आघाडी सरकारच्या विधानसभा तालिका अध्यक्षानी या 12 आमदाराना बोलू न देता जेव्हा ह्या आमदारांनी तालिका अध्यक्षाच्या समोर वेल मधे घोषणाबाजी केली तेव्हा तालिका अध्यक्ष यांनी भाजपाच्या 12 आमदाराना एक वर्षाकारिता निलंबित केले त्यामुळे या आघाडी सरकारचे ओबीसी विरोधी धोरण पुन्हा उघड़े पडले.या आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळेच राज्यातील ओबीसी चे राजकीय आरक्षण गेले असतांना सुद्धा सरकार या विषयाला घेवून गंभीर नाही व राज्याच्या सर्वोच्च सभागृहात चर्चा करायला सुद्धा तयार नाही. त्यामुळे या आघाडी सरकारच्या मनात ओबीसीच्या राजकीय आरक्षणाबाबत पाप आहे, हे सिद्ध होते अशी घणाघाती टीका भाजपा भंडारा तालुका अध्यक्ष विनोद बांते यांनी राज्यसरकारवर केली.
तसेच आपल्या ओबीसी चे राजकीय आरक्षण परत मिळवून देण्याकरिता सभागृहात लढणाऱ्या 12 लढवैय्या आमदारांचे भाजपा भंडारा तालुक्याच्या वतीने जाहीर हार्दिक आभार मानले. वरील सर्वं मागण्याबाबत सरकारनी त्वरित सकारात्मक कार्यवाही करावी असे निर्देश आपण राज्य सरकारला द्यावे अशाप्रकारचे निवेदन मा राज्यपाल भगतसिंग कोसयारी यांना मा तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या मार्फत पाठविण्यात आले. वरील मागण्या मान्य कराव्यात अन्यथा भारतीय जनता पार्टी ओबीसी समाजासह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारेल याची सरकारनी नोंद घ्यावी असा इशारा देण्यात आला. यावेळी प्रामुख्याने तालुका अध्यक्ष विनोद बांते, जिल्हा महामंत्री प्रशांत खोब्रागडे, जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र निंबार्ते, अरविंद भालाधरे, नितीन कडव, रवींद्र वंजारी, प्रीती गोसेवाडे, विष्णुदास हटवार, चंद्रप्रकाश दुरूगकर, मनीषा कुथे, रोशनी पडोळे, उमेश मोहतुरे, मनोहर खरोले, वर्षा गोवर्धन साकुरे, शेखर खराबे, नीलकंठ कोयते, भीमराव कहालकर, नंदलाल हटवार, राजहंस वाडीभश्मे, अमित वसानी, दिलीप फटिक, बबलू आतिलकर, गोवर्धन साकुरे, कुलदीप सुखदेवे, अरुण कारेमोरे, चंद्रशेखर भिवगडे, विकास निंबार्ते, वामन शहारे, विजय लिचडे, रोशन ठवकर, पुरुषोत्तम कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.