माळीनगर प्रतिनिधी उल्हास चंदनशिवे
पोलीस मित्र परिवाराच्या वतीने सतत पोलीस आणि जनता यांच्यात सलोख्याचे व जिव्हाळ्याचे संबंध जोपासण्यासाठी सतत प्रयत्न केला आहे. समाजातील चांगले काम करणारे युवक महिला पुरुष व पोलिसांचे नातेवाईक यांना सोबत घेऊन हा परिवार सातत्याने काम करत आहे
अनेक ठिकाणी अनेक कठीण प्रसंगात ती पोलिसांच्या मागे नाहीतर सोबत उभा असतो तो हा परिवार आज दिनांक 3/7/2021
11:30 वा अकलूज पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय अरुण सुगावकर सर यांनी सामाजिक काम करणाऱ्या पोलीस मित्रांचा खास पोलीस स्टेशनला बोलून सन्मान केला .
जखमी कबुतराचा जीव कसा वाचवला आला होता याची माहिती घेतली आनंद व्यक्त केला. हकीकत अशी की काल पतंगाच्या मांजा चा दोरा पंखात अडकून एक कबूतर जिवाच्या आकांताने तिसऱ्या मजल्यावर फडफडत होते ते मोठ्या शिताफीने काढून वाचवले व काबूतराचा जीव वाचवला. ही गोष्ट मा सुगावकर साहेबांना माहिती झाली होती
त्यानी लगेच पोलीस मित्र विश्वजित सुरवसे , पाटील ,व सागर कांबळे यांना पोलीस स्टेशन ला बोलावून पुष्पगुच्छ देऊन गैरव केला. घटना अत्यंत साधी आहे .परंतु मागील महिन्यात मांजा गळ्यात अडकल्याने गळा चिरल्याने अकलूज मध्ये एका इसमाचा जीव गेला होता. त्या पार्श्वभूमीवर मांज्याच्या दोऱ्या मुळे काबूतराचा जीव जाऊ नये म्हणून विश्वजित सुरवसे पाटील, व सागर कांबळे, या दोघा युवकांनी काबूतराचा जीव वाचवला व जीवदान दिले व या पुढील काळात आशा घटना होऊ नये म्हणून काळजी घ्यावी असे माग्दर्शन ही मा सुगावकर सरांनी केले व शाबासकी दिली ही प्रेरणा युवकांसाठी संजीवनी ठरणार आहे हे नक्की