डॉक्टर दिनाचे औचित्य साधून सोलापूर येथे रिपाई गवई गटाच्या वतीने डॉक्टर डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
या कार्यक्रमात वैद्यकीय सेल चे प्रदेश प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रमोद कसबे अक्षरा हॉस्पिटलचे डॉक्टर सचिन नरोटे दमानी ब्लड बँकचे मेडिकल ऑफिसर डॉक्टर निलोफर शेख डॉक्टर नफिसा हॉस्पिटल यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी बोलताना डॉक्टर सचिन नरोटे यांनी डॉक्टरांचि सत्कार हा त्यांच्या केलेल्या कामाची पावती असून पाठीवर थाप मारल्यासारखे आहे असे गौरवोद्गार काढले. रुग्णालयात दाखल झालेल्या प्रत्येक रुग्णाची योग्य ती काळाची व दखल प्रत्येक डॉक्टर घेत असतात पण तरी हॉस्पिटलची तोडफोड होते अपमानास्पद वागणूक रुग्णाचे नातेवाईक देतात.
तरी समाजात डॉक्टरांना आपुलकीचे व प्रेमाची वागणूक मिळावी असे मत या वेळेस त्याने मांडले. वैद्यकीय सेलचे अध्यक्ष डॉक्टर प्रमोद कसबे यांनी कोविङ काळात डॉक्टरांनी आपल्या जिवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली प्रत्येक रुग्णासाठी डॉक्टर हा आपल्या घरातील रूग्णाप्रमाणे झटला
आपल्या कुटुंबाची पर्वा न करता डॉक्टर दिवस-रात्र या कोरडा मारीत काम करत आहे वैद्यकीय सेल महाभारत प्राण गमावलेल्या डॉक्टरांना अभिवादन करते डॉक्टरांच्या कोणत्याही समस्येसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट वैद्यकीय सेल सदैव तत्पर राहील वैद्यकीय कर्मचारी डॉक्टर यांनी वैद्यकीय सेवेची संपर्क साधावा.