अकलुज ग्रामपंचायत नगरपालिकेमध्ये विलगीकरण करण्याचा प्रस्ताव बऱ्याच दिवसांपासून धूळ खात पडला आहे.शासनाने लवकरच या मागणीचा विचार करून अकलूज ग्रामपंचायतीचे नगरपालिकेत रूपांतर करावे.त्याचप्रमाणे सन 2015 पासून अकलूजचा शिवसृष्टी किल्ला ग्रामपंचायतीने आपल्या ताब्यात घ्यावा व त्याला पाहायला असणारे तिकीट बंद करावे.भविष्यात जरी अकलूज नगरपालिका झाली तरी शासनाने शिवसृष्टी किल्ला पालिकेच्या ताब्यात देण्याचे आदेश पारित करावे. कोरोना महामारीच्याच्या पार्श्वभूमीवर देशातील जनतेचे आर्थिक कंबरडे मोडले असताना केंद्र शासनाने इंधनाचे भाव गगनाला भिडवले आहेत तरी इंधन दरवाढ कमी व्हावी,मराठा समाजाला आरक्षण मिळावे.या मागण्यांसाठी योद्धा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष शेखरभैय्या खिलारे यांच्या नेतृत्वाखाली अकलुज आंबेडकर चौकातून बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार घालून मोर्चा प्रांतकार्यालय पर्यंत काढण्यात आला.सादर मोर्चासाठी बहूसंख्येने अकलुज व परिसरातील नागरिक व महिला उपस्थित होत्या.अकलुजमध्ये नगरपरिषदेची साखळी पद्धतीने आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला अकलुज शहराच्या विकासाच्या दृष्टीने सर्वांचा सहमतीने पाठिंबा देण्यात आला पाठिंब्याचे पत्र मा.विश्वतेज मोहिते पाटील यांनी स्वीकारले.त्यावेळी राजाभाऊ खिलारे,सन्मित्र संघाचे सुरेशभाऊ गंभीरे,बापूसाहेब वाघमारे,समीर भाई शेख,केरबा लांडगे,लाला वसगडेकर,डॉ.नागनाथ दगडे,रुक्मिणी ताई रणदिवे,धनाजी साठे,दत्ताभाऊ साळुंखे,मनोज जगताप,बिभीषण पाटील,बच्चन साठे,करण कांबळे,करण ठोंबरे,हिरा खंडागळे,चैतन खिलारे,अविभैय्या सोनवणे, साहिल आतार,दत्ता गोरे,पपु पवार,नाना हनुवते,नामदेव मिसाळ,शिवा मिसाळ,सागर साळुंखे,इत्यादी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते सदर मागणीचे पत्र नायाब तहसीलदार कारंडे साहेब यांनी स्वीकारले.