मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि 1 जुलै 2021:-
लातूर जिल्ह्यात 5 वर्षाच्या लहान मुलाला जीवे मारण्याच्या हेतुने गावातील पाटलाने उचलून..उचलुन आपटुन रक्तबांबाळ केले असल्याचे विश्वसनीय वृत हाती आले आहे. रक्तबांबाळ झालेल्या मुलाच्या रडण्याने भयभित झालेत संपुर्ण केळगाव मधील वस्ती. केळेगाव ता निलंगा येथे राहणारे शत्रुघन लहु कांबळे त्यांची पत्नी लक्ष्मी कांबळे ,दोन मुली प्रतिक्षा आणि प्रज्ञा तर अवघ्या 4 वर्षाचा मुलगा प्रदिप शत्रुघन कांबळे,भाऊ लखन कांबळे आणि त्यांची पत्नी पुजा कांबळे हे शेती करण्यासाठी त्यांच्या शेतात गेल्यावर झरी या गावातील मराठा समाजाचे ज्योतीराम हणमंतराव पाटील दिनकर व्यंकटराव पाटील लक्ष्मण पाटील संगिता पाटील हणमंत पाटील किसन पाटील हे सर्व मिळुन शेतात आले, आणि आमच्या मराठा समाजाची जमीन तुम्ही खरेदी केली. तुमची औकात आहे का❓नाहीतर ,तुम्ही महारगे लोक आमच्या शिळ्या तुकड्यावर जगणारे आमची चाकरी करणारे लोक आहात .तुम्ही ही जमीन करायची नाही . शेतात पाऊल टाकायचे नाही .. नाहीतर तुमच्यासह तुमचा वंशजालाही पुर्ण संपवुन टाकु असे म्हणुन आम्हाला मारहाण केली. माझी बायको आणि वहीणीला त्यांनी मारहाण केली त्यांना खाली पाडुन त्यांच्यावर बळजबरी करून विनंयभंग केला, त्यानंतर शेतातच असणारा माझा 4 वर्षाचा मुलगा प्रदिप याला उचलुन दोन वेळा शेतात आपटले .बोला!! तुमचा वंशज पण संपवून टाकतो.. पुन्हा तुमची खैरलांजी सारखी अवस्था करतो. .या आधी ही आम्ही निलगा पोलिस स्टेशन ला लेखी तक्रार केली होती. लातुर पोलिस मुख्यालयातही तक्रार दाखल केली होती. या पाटला पासुन आमच्या जीवाला धोका आहे. तो पाटील आम्हाला जीवे मारण्याची धमकी देतो. आम्हाला संरक्षण द्या. त्या पाटलावर कारवाई करा. याबाबत पोलिसांनी बघ्याची भुमिका घेतली असल्याचे दिसून येते. ज्यांच्या विरुध्द तक्रार केली त्यांच्या वर गुन्हा दाखल केला??परंतु त्यांच्यावर काहीच कारवाई केली नाही. आज दिनांक 1 जुलै 2021 रोजी सकाळी आम्ही शेतात गेल्यावर आरोपींनी सर्वांनी आम्हाला जीवे मारण्याच्या हुतुनेच मारहाण केली. आम्हा सर्वांना रक्तबांबाळ केले, माझ्या 4 वर्षाच्या मुलाचा या मध्ये जीव गेला . गुन्हेगार पैशाच्या जोरावर अजुन मोकळेच आहे. त्यांना अटक केली नाही . त्या गुन्हेगारांना अटक करावी
आणि मला न्याय मिळावा .
अजुन ही आरोपीला अटक झाली नाही . त्यामुळे या प्रकरणात पोलीसांनी आपले खिसे गरम करून घेतले असावे? अशी चर्चा सुरू आहे. या प्रकरणा बाबत वरिष्ठ पोलीस अधिकारीही गप्प का आहेत.? हे एक कोडेच आहे.