गडचिरोली विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 1जूलै 2021:-
आरोग्य धन संपदा ह्या म्हणीला ज्यांनी टाळलं त्यांनी डॉक्टर मंडळींचे आभार मानून जीवन जगावे. भारतीय संस्कृती मध्ये वैद्य,हकीम,राजवैद्य अशी मंडळी आरोग्य सेवा देत होती आणि आहेत..आधुनिक काळात तंत्रज्ञान विकसित झाले. आयुर्वेदिक औषधे, होमियोपॅथी, युनानी ही व्यक्तीपरत्वे थोडी बाजूला गेली. आलोपथी ही विदेशी औषध आपल्या देशात भांडवलदार लोकांनी रुजविली,फुलविली. हे सत्य नाकारता येणार नाही..मुळात आज त्या विषयावर भाष्य करायचे नाही..!
डॉक्टर मंडळी ही देवाची प्रतिकृती या धर्तीवर आहे, ह्यात शंका आणि दुमत नाही. देव म्हणणे कोण जो आनंद देतो ,दुःखहर्ता असतो तो.जसे काही राजकीय सत्ताधारी काही लोकांना दुःखहर्ता असतात. राजकीय लोकांच्या पाया पडताना आपण अनेकांना बघतो.तसे बरीच मंडळी डॉक्टर लोकांच्या पाया पडतात .राजकीय लोकांच्या पायावर डोकं ठेवण्यापेक्षा डॉक्टर लोकांच्या पायावर मनापासून, असिम प्रेमाने डोके ठेवणारे खरे आभार मानत असतात. हे महत्त्वाचे ..!
आम्ही आजपर्यंतचा जीवन प्रवास करतांना अनेक निस्वार्थ रुग्ण सेवा करणारी देव माणस बघितली. तर काही डॉक्टरच्या नावाखाली कसाई काम करणारे सुद्धा बघितली. मात्र,आज देवा चा नामजप करावा.डॉक्टर लोक रात्रंदिवस जी रुग्णसेवा देतात ती सेवा अत्यंत हलाकिच्या परिस्थितीतही देतात,त्यांना तर ऑफ आहेच .मात्र प्रत्येक डॉक्टर जे..जे मनापासून रुग्णसेवा करतात.त्या सर्व डॉक्टर मंडळीना आज आणि नेहमीच धन्यवाद दिलेच पाहिजेत . अनेक रुग्ण मृत्यूच्या दाळेतून बाहेर काढणारी अथक परिश्रम घेणारी डॉक्टर मंडळी बघतो. जलदगतीने आयुष्य जगणाऱ्या माणसांना आलोपथी हे औषधे उपोयोगी पडतात.
आजकाल लोकांना ताबळतोब आराम हवा असतो.त्यामुळे आलोपथी डॉक्टर लोकांची भारतात रेलचेल झाली.मात्र,अशाही परिस्थितीत आमचे आयुर्वेदिक, होमियोपॅथी, युनानी डॉक्टर मंडळी जीव लावून आरोग्य सेवा देतात.नाममात्र मोबदला घेतात अश्या महान डॉक्टरांचे सुद्धा शतशः आभार मानलेच पाहिजेत.शरीराचे दुःख दूर करणारे हे डॉक्टर रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करतात.त्यातही विशेषतः सरकारी रुग्णालयात सेवा देणाऱ्या डॉक्टर मंडळींचे कार्य हे ज्यास्त जोखमीचे असते.या लोकांवर बेअक्कल, गुंडगिरी, मुजोर, दलाल, स्वार्था साठी काम करणारे राजकीय गुंड जेव्हा हल्ले करतात तेव्हा मन हेलावून जाते .या डॉक्टर मंडळींना सुरक्षा मिळणे नितांत गरजेचे झाले आहे. या करोना भयावह काळात सर्वात जास्त मेहनत याच सरकारी डॉक्टर मंडळीने घेतली आहे आणि घेत आहेत.स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्ण सेवा देणारी ही मंडळी खरोखरच ग्रेट आहे. आजही आपल्या देशात डॉक्टर लोकांची प्रचंड कमी आहे. अश्या परिस्थितीत आदिवासी, दुर्गम भागात आपली रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टर लोकांना विसरता येणार नाही.आजच्या आधुनिक काळात आमच्या सातपुड्याच्या परिसरात निशुल्क किंवा नाममात्र फी घेणारे डॉक्टर आम्ही बघतोय..आजही आदिवासी देतील तो मोबदला घेऊन रुग्ण सेवा स्वतः आर्थिक गरीब राहून करणारे डॉक्टर तर देवा पेक्षा श्रेष्ट आहेत. यात शंका नाही !
आज।डॉ दिवस माझ्या सर्व मित्रवर्य डॉक्टर मंडळींना मनस्वी शुभेच्छा.आपणास निर्मिक उदंड आयुष्य देवो,आपल्या हातून अखंडित रुग्णसेवा घडो हीच आजच्या दिवसाला प्रार्थना.
(विजय विमल सहादेवराव पोहनकर जळगांव (जामोद)
जिल्हा बुलढाणा(मातृतीर्थ)
1जुलै2021)