फुले – शाहू – आंबेडकर विचारांचा वारसा असणाऱ्या महाराष्ट्र राज्यात गोखले, रानडे, आगरकरांच्या सुधारणावादी पुण्यात हवामान खात्यातील ब्राम्हण खोले बाईंना ‘मराठा’ जातीची स्वयंपाकीन चालत नाही, ही घटना आजूनही ताजी असतानाच “रांडचे इथे जयभीम बोललीस तर जीभ हासडून देईल.” असा लज्जास्पद प्रकार घडल्याने आपण माणूस म्हणून केव्हा बंधुभाव जोपासणार ? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
रुग्ण हक्क परिषदेचे कार्यालय नारायण पेठेत आहे. तिथे महिला सबलीकरण आणि आर्थिक सक्षमीकरण विभागात काम करणाऱ्या कविता जगदाळे ( पीडितेचे नाव बदलले आहे.) यांना जातीयवादी शेरेबाजीला बळी पडावे लागले आहे. कविता जगदाळे व्यावसायिक गायिका आहेत. उच्चशिक्षित आहेत. ऑर्केस्ट्रामध्ये हिंदी-मराठी गाणीही गातात. बुध्द आणि भीम गीतांच्या गायिका म्हणूनही त्या राज्यात प्रसिध्द आहेत. लॉकडाऊनमुळे ऑर्केस्ट्रा कार्यक्रम बंद असले, तरी त्या काम करत असलेल्या रुग्ण हक्क परिषद यांच्यामार्फत गरीब महिलांना तयार जेवण देणे आणि मोफत अन्नधान्य वाटपाचे काम कविता करत होत्या. रुग्ण हक्क परिषदेच्या अंतर्गत असणाऱ्या महा -रजत पतसंस्थेच्या गोखलेनगर भागातील महिलांचे बचत गट तयार करणे, त्यांना व्यावसायिक दृष्टीने सबल करणे, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याचे काम त्या झोकून देऊन करतात.
रुग्ण हक्क परिषदेचे कार्यालय पुण्यातील नारायण पेठ भागात आहे. या ठिकाणी दररोजच्या कामाच्या अहवाल सादर करण्यासाठी कविता जगदाळे या नारायण पेठेत येतात. त्यांना येणाऱ्या फोनची सुरुवात ‘जयभीम’ बोलूनच होते. त्यांना मंगळवारी दुपारी त्यांच्या नातेवाईकांचा फोन आल्यावर त्या फोनवर बोलण्यासाठी कार्यालयाच्या दारात येऊन बोलत असताना, त्यांना संस्थेच्या कार्यालयासमोर राहणाऱ्या आरती कर्वे या ब्राम्हण महिलेने मध्येच थांबवून इथे जोरजोरात जयभीम जयभीम करून बोलायचे नाही, नाही तर जीभ हासडून देईल ही ब्राह्मणांची वस्ती आहे. तुम्हा महार – मांगाचे इथे काम नाही. रांडचे इथून चलती हो! अश्या शेरेबाजीला सामोरे जावे लागले.
यावर कविता जगदाळे म्हणाल्या की, मी सामाजिक कार्यकर्ती म्हणून काम करते. आमच्या महारजत महिला पतसंस्थेच्या माध्यमातून गोखले नगर भागातील महिलांसाठी मी काम करते. मी दररोज घडलेल्या घडामोडी आणि संस्थेसाठी हिशोब जमा करण्यासाठी दररोज दुपारी दोनच्या वेळेत नारायण पेठ येथील कार्यालयात आले होते. त्यावेळी मला माझ्या नातेवाईकांचा फोन आला व त्यांनी मला जय-भीम तुम्ही कशा आहात? असे म्हणून बोलण्यास सुरुवात केली कार्यालयात फोनला रेंज नसल्यामुळे मी बोलत बोलत बाहेर आले असता मी त्यांना जय-भीम म्हणून प्रतिसाद दिला तसेच लोक डाऊन मुळे आपली भेट नाही घरी जेवायला या मी तुमच्यासाठी मटन करते अशा पद्धतीचा आमचा संवाद सुरू असताना कार्यालया समोरील फ्लॅट मध्ये राहणाऱ्या आरती कर्वे यांनी माझे फोन वरील बोलले मदत थांबवुन जोरजोरात ओरडून इथे जय भीम जय भीम म्हणून जोरजोरात ओरडत बोलायचे नाही. ही ब्राह्मणांची वस्ती आहे. रांडचे इथून चालती हो! असे म्हणून माझ्याशी भांडण केले. विशेष म्हणजे आरती कर्वे या महिलेच्या मुलाने गेल्याच आठवड्यात मला तुमच्याशी मैत्री करायला आवडेल माझे तुमच्यावर प्रेम आहे म्हणून त्यांचा हातही पकडला होता. हात पकडताना मात्र जात आडवी आली नाही. यावेळी कविता जगदाळे यांनी संबंधित मुलाला चांगलेच खडसावले होते.
कविता जगदाळे म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेने मी उच्चशिक्षित होऊन स्वतःच्या पायावर उभे असताना, स्वतःच्या कर्तुत्वाने स्वतःला सिद्ध करत असताना पुण्यासारख्या संवेदनशील शहरामध्ये मला “जय भीम बोलायचे नाही.” असे म्हणून अश्लील शिवीगाळ करीत केलेल्या अपमानामुळे मला प्रचंड वेदना झाल्या आहेत.
विशेष म्हणजे सदर महिला आरती कर्वे या प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करत आहेत, आणि सदरील शाळेने त्यांच्यावर ‘संस्कार’ विभागाची जबाबदारी दिलेली आहे.
पुण्यात घडलेल्या या प्रकारामुळे मात्र सर्वत्रच संतापाची भावना निर्माण झाली आहे.