सोलापूर प्रतिनिधी
राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीपभाई जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या महाराष्ट्र कार्यकारिणी फादर बॉडी सदस्यपदी अकलूज येथील सोमनाथ अरुण भोसले यांची निवड करण्यात आली.
गेली तीन वर्षापासून सोमनाथ भोसले हे पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पदावर काम करीत आहेत. जिल्हाध्यक्ष पदावर काम करीत असताना त्यांनी वेगवेगळी आंदोलने करून समाजाला न्याय मिळवून दिला आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे साहेब यांच्या शिफारशीने राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांनी त्यांची पीपल्स पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या राज्य कार्यकारणी फादर बॉडी सदस्यपदी निवड केली आहे.सध्या ते जिल्हाध्यक्ष पदावर काम करत असून त्यांचेवर आणखी मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.रिपब्लिकन चळवळीत कमी वयामध्ये त्यांची सोलापूर जिल्हाध्यक्ष व राज्य कार्यकारणी सदस्यपदी निवड झाल्याने त्यांचे कौतुक होत आहे. निवडीला उत्तर देताना सोमनाथ भोसले म्हणाले की पक्षाने माझ्यावर खूप मोठी जबाबदारी दिली असून भविष्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीची ताकद आणखी वाढवणार असून समाजाच्या विविध प्रश्नांवर तीव्र आंदोलने करून न्याय मिळवून देणार आहे. कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांच्या अध्यक्षतेखाली व राज्य कार्यकारणीच्या प्रमुख उपस्थितीत अकलूजमध्ये जाहीर सभा घेणार असल्याचे सांगितले.
त्यांच्या निवडीबद्दल पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर ,राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीपभाई कवाडे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवणे, राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे यांचेसह महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.