मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि 29 जून 2021:-
मुस्लिम समाज बांधवांसोबत ओबीसी समाज बांधवांना न्याय मिळाला पाहिजे हि बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची ठाम व कायदेशीर भूमिका आहे या दोन्ही समाज बांधवांच्या महत्त्वाच्या आरक्षणाच्या मुद्द्यांना घेऊन संविधान तज्ञ अॅड. डॉ. सुरेशजी माने साहेब राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी यांच्या आदेशानुसार बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी तर्फे कोरोनाच्या महामारीचे शासनाच्या नियमांचे पालन करीत पक्षाच्या मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत लोकशाही मार्गाने घोषणा देऊन निदर्शने करत सविस्तर निवेदन जिल्हाधिकारी धुळे यांचे मार्फत मा. मुख्यमंत्री उध्द्वजी ठाकरे यांना पाठविण्यात आले . यावेळी पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भालचंद्र सोनगत , सलीम शिखलकर व्यापारी आघाडी इम्रान पठान शहराध्यक्ष, नईम हिरो, आबिद शहा, सलीमभाई कुरेशी प्रकाश मोरे, किरन बोरसे तसेच युवा आघाडीचे रोहित चांगरे, गुड्डू अहिरे, तुषार सोणवने,सुल्तान अन्सारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते .
तसेच शिरपूर तालूका तहसील कार्यालय शिरपुर यांच्या मार्फतही मा. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी शिरपूर तालुका युवा आघाडी तर्फेही निवेदन पाठविण्यात आले. यावेळी शिरपूर तालुका युवा आघाडी चे प्रशांत पवार, धीरज बोरसे, राकेश कोळी, विकास पारधी, सागर चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते . अशी माहिती भालचंद्र सोनगत उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष बहुजन रिपब्लिकन
सोशलिस्ट पार्टी यांनी दिली.