मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम. दि. 29 जून 2021:-
" आज जिकडे तिकडे देवालयाचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न चालू आहे. हा प्रयत्न करणाऱ्याच्या शुद्ध हेतू बद्दल शंका नाही. परंतु देवालयात जाण्यास मिळाले म्हणजे तुमचा उद्धार होत नाही. हे लोकांनी विसरता कामा नये. देवालयातील मुर्तिभोवती खेळणाऱ्या आध्यात्मिक भावनेपेक्षा पोटाची खळगी कशी भरतील याची विवंचना अगोदर बाळगली पाहिजे. खाण्यास पुरेसे अन्न नाही, अंगभर वस्त्र नाही, शिक्षण घेण्याची सोय नाही, द्रव्यांच्या अभावी औषध पाणी घेता येत नाही अशा दैन्यावस्थेत सापडलेला आपला समाज आहे.
जे पुढारी निवडाल व त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवाल ते खरे मार्गदर्शक होतील. तुमचे हित व त्यांचे हित एक असेल व जे स्वार्थी नसतील असेच पुढारी निवडा. दुसऱ्या पक्षाच्या ओंजळीने पाणी पिणारे किंवा त्यांची भाडोत्री कामे करणारे लोक केवळ फाटाफूट करतील व दिशाभूल करतील. ते दगा दिल्याशिवाय राहणार नाही. तरी या नामधारी पुढाऱ्यांपासुन तुम्ही दुर रहा. असे मत प्रशांत चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.
(संदर्भ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषण खंड-१८, भाग-१, पान नं.३७३)
दि.२८ सप्टेंबर १९३२ रोजी, बी. डी. डी. चाळ मैदान, वरळी, मुंबई येथील बाबासाहेबांचे भाषण.)