जनतेची मागणी गडचिरोली
गडचिरोली विभागीय प्रतिनिधी.
दि. 28 जून 2021 :-
गडचिरोली शहरातील फुले वार्डातील आंबेडकर चौकात वास्तव्य करीत असलेले दुर्योधन रायपुरे या तरुण सामाजिक कार्यकर्त्याचा रहस्यमयरित्या निघुऀण हत्या त्याच्या राहत्या घरातच करण्यात आली . रायपुरे यांच्या रहस्यमय हत्येचा अजून पर्यंत तपास पोलिसांच्या हाताला लागलेला नाही .खुनाच्या तपासात पोलिसानी वापरलेली स्वान पथके सुद्धा अपयशी ठरलेली आहेत् त्यामुळे शहरात व वार्डात निघुऀण हत्येच्या चर्चेला जास्तच पेव फुटू लागलेले आहे. दुर्योधन रायपुरे यांच्या निर्घृण हत्येचा तपास एपीआय गडचिरोली यांच्याकडे दिलेला आहे परंतु गडचिरोली पोलिसकडून होत असलेला तपास हा अतिशय मंद गतीने होत असल्यामुळे पोलिसांवरील जनतेचा विश्वासच उडालेला आहे असे मत मे. अनुप यांनी व्यक्त केले आहे. गडचिरोली इ पी आय यांच्याकडे दिलेला निघुऀन हत्येचा तपास त्यांच्याकडून काढून सीआयडी या गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्याची मागणी वार्डातील व शहरातील जनतेने केलीली आहे .निर्गुण हत्येच्या तपासात आरोपीस पकडण्यास पोलिसांना अपयश आल्यास वार्डात व शहरातील जनतेने पोलिस प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याच्या मार्गावर आहेत . सामाजिक कार्यकर्ते दुर्योधन रायपुरे यांच्या निर्घृण हत्येने वार्डात दहशतीचे वातावरण निर्माण झालेले असून वार्डात आयाबायाच्या मनात भयभयता निर्माण झालेली आहे . निर्घृण खुनाचा तपास योग्य पद्धतीने करून मारेकऱ्याचा शोध घेऊन खरे मारेकरी शोधून काढावे व मृतकास न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी नागरिकांनी केली आहे..