गडचिरोली विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 27 जून 2021:-
दिनांक 26/06/2021ला जिल्हा गडचिरोली मुलचेरा तालुक्यात मा. किशोर पोतदार शिवसेना गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख यांचा जनसंपर्क दौरावर आले असता मा. उद्धवसाहेब ठाकरे, शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री यांच्यावर विश्वास ठेवून इतर पक्षातील असंख्य कार्यकर्तेंनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. याप्रसंगी नवनियुक्त पदाधिकारी गडचिरोली जिल्हा सहसंपर्क प्रमुख मा. विलास कोडापे, आरमोरी विधानसभा शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, अहेरी विधानसभा जिल्हाप्रमुख रियाजभय्या शेख यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मा. पोतदार साहेब उपस्थित सर्व शिवसैनिकांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, सर्व शिवसैनिक एकजुटीने आपसातले मतभेद विसरून पक्ष मजबूत करण्याच्या कामाला लागावे. येणाऱ्या नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हापरिषद निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार निवडून आले पाहिजे असे आव्हान केले. इतर पक्षातील जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना शिवसेनेत पक्ष प्रवेश करून घेण्याचेही आव्हान केले. यावेळी माजी उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम, अहेरी विधानसभा प्रमुख अरुणभाऊ धुर्वे, अहेरी विधानसभा संघटक बिरजूभाऊ गेडाम, मुलचेरा तालुकाप्रमुख (शहर ) गौरव बाला, तालुकाप्रमुख (ग्रामीण )काशिनाथ कन्नाके, बंगाली समाज प्रमुख दीपक बिस्वास, मुलचेरा संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष संजय मंडल, मुलचेरा संघटक निलकमल मंडल, अहेरी उप तालुका प्रमुख प्रफुल येरणे, उपतालुका प्रमुख राज गुंतीवार, उत्तम बिस्वास, मुकेश ठाकूर, नकुल मंडल, दिलीप बिस्वास, सीमा मंडल, बहूसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.