गडचिरोली विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि 27 जून 2021:-
मनाचा मोठेपणा हा माणुस परिपक्व झाल्याचे लक्षण असल्याचे सांगितले जाते. मनाचा मोठेपणा म्हणजे विचारपूर्वक आणि समोरच्या व्यक्तीच्या भावना लक्षात घेऊन वागणं, दुसऱ्या व्यक्तीच्या चांगल्या कामाचे कौतुक करण्यासाठी सुद्धा तो माणुस तेवढ्याच दिलदार आणि मोठ्या मनाचा असावा लागतो. परंतु मुजो…..र लोक स्वार्थासाठी दुसऱ्यांच्या चांगल्या कामात अडचणी निर्माण करण्याचा विचार करून कटकारस्थान करतात. कोणत्याही क्षेत्रात चांगल्याप्रकारे काम करतात त्यांच्या भावनांची कदर केली तरच अधिक समाधान मिळेल .दुसऱ्यांच्या चांगले कामांचा , रात्रंदिवस मेहनतीने यशस्वी होण्यासाठी धडपड करणाऱ्या व्यक्तींचा योग्य पध्दतीने विचार करण्याच्या व्रृत्तीने आयुष्य चांगले होते. नाही तर “” जो स्वतः च्या स्वार्थासाठी मुजो….री करून, पैशाच्या हव्यासापोटी हेतुपुरस्सर दुसऱ्यांसाठी खड्डे खोदतो तोच एक ना एक दिवस खड्यात जातो.””.
स्वार्थासाठी मुजो… र, माणूस मनात कपट ठेवून दुसऱ्याची पर्वा करीत नाही. आणि समंजसपणाची भरपाई पैशाने करु पहाणारे काही माणसे असतात .पैश्यापेक्षा समंजस असणे फार महत्वाचे असते . कारण समंजसपणा हा खऱ्या सुसंवादाचा पाया असतो. परंतु मुजो.. र लोक सुसंगत आणि सुसंवादाच्या पात्र नसतात.
मुजो…रीतीने वागणारी व्यक्ती चे बाबतीत “अंदाज” चुकिचे असू शकतात पण “अनुभव” कधीच चुकिचे असू शकत नाही,कारण…”अंदाज” आपल्या मनाची “कल्पना” आहे “अनुभव”आपल्या जीवनातील अनुभव हा घराचा प्रमुख होणे सोपे नाही…..
जो ऊन,पाऊस,वारा,वादळ आदी सर्व नैसर्गिक आपत्ती झेलतो,
परंतु त्या खाली राहणारे नेहमी म्हणतात की,”हा खुप आवाज करतो.”
आपण ज्याची इच्छा करतो प्रत्येकवेळी तेच आपल्याला मिळेल असे नाही, परंतु मुजो.. र लोक याचा विचार करित नाही. आयुष्य खुप सुंदर आहे . मुजोरांनी सुध्दा आनंदात जगावे आणि दुसऱ्यालाही आनंदात जगु द्यावे. सर्वानी आनंदात राहा आपल्या समाजातील मजोर माणसांवरही जिव्हाळा कायम राहातो. …!!!
आपल्यामुळे कोणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्यावी त्याप्रमाणे वागायला सुरुवात करावी., एकमेकांना धीर द्यावा त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या. आतापर्यंत असलेल्या मैत्रीत,, प्रेमात गळा कापण्याचे षडयंत्र मुजोरांनी करू नये. सरकारी नियमांचे व सुचनांचे सर्वानी प्रामाणीकपणे व काटेकोर पालन करावे,प्रशासकीय कामात सरकारला सहकार्य करावे. खोट्या राजकारणी लोकांच्या अफवापासून दूर व सावध राहावे. प्रत्येकाने प्रथम स्वतःचा विचार करावा. स्वार्थासाठी काही प्रमाणात कपटाने वागणाऱ्या मुजो.. रापासून सावध राहावे.
जागृत राहावे, सतर्क राहावे सुरक्षित राहावे .