नागभीड, विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि 26 जून 2021:-
नागभीड नगर परिषद क्षेत्रातील प्रभागातील विविध समस्यावर आणि दिव्यांग व्यक्तिना तात्काळ राखीव निधी देण्यात यावा यासाठी भारतीय क्रांतिकारी संघटनेचे उपाध्यक्ष टेरेन्स कोब्रा व भारतीय क्रांतिकारी दिव्यांग आघाडीचे तालुका महासचिव चंद्रशेखर नारायणे यानी नगर परिषदेचे नगराध्यक्ष याचेंशी परस्पर चर्चा केली.
कोरोना लाॅकडाऊन काळात दिव्यांग व्यक्ती आर्थिक परिस्थितीने होरपळून गेला अशा परिस्थितीत जगावे कसे हा प्रश्न निर्माण होत आहे. दिव्यांगाना राखीव निधीतून थोडाफार आर्थिक सहयोग मिळेल या हेतूने दिव्यांगाचा राखीव निधी तात्काळ खर्च करण्यात यावा अशी मागणी भारतीय क्रांतिकारी संघटनेचे उपाध्यक्ष टेरेन्स कोब्रा व तालुका महासचिव चंद्रशेखर नारायणे यानी केली. नागभिड क्षेत्रातील विविध प्रभागातील रस्ता, नाली, पाणी इत्यादी ज्वलंत प्रश्नावर नगराध्यक्ष माननीय हिरे सर यांचेशी चर्चा केली. प्रभागातील समस्याचे तात्काळ सोडवू आणि दिव्यांगाचा राखीव निधी येत्या पंधरवाडय़ात खर्च करू असे आश्वासन यावेळी दिले.
भारतीय क्रांतिकारी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. अशी माहिती प्रसिध्दी प्रमुख भारतीय क्रांतिकारी संघटना नागभीड यांनी दिली आहे.