मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम.दि. 26 जून 2021:-
भाजपचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह काही नगरसेवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना ओबीसी आरक्षण लागू केले आहे. ते रद्द करण्यासाठी भाजपच्या वतीने आज राज्यात चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. या आंदोलनात भाजपचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांसह अनेक नेते सहभागी झाले होते.
प्रवीण दरेकरांनी ठाण्यामध्ये आंदोलन पुकारले होते. काही वेळ आंदोलन चालले मात्र त्यानंतर पोलिसांनी दरेकरांसह आणखी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांचा आणि राज्य शासनाचा हे आंदोलन दडपण्याचा प्रकार असल्याचे भाजपकडून सांगितले जात आहे. पूर्ण महाराष्ट्र सध्या हे आंदोलन सुरू आहे. अहमदनगर मध्ये देखील राम शिंदेंच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले होते.