|चांदापुरी प्रतिनिधी|रशीद शेख
दुर्घटना कधीही समजून येत नाही. मात्र त्याची पूर्वसूचना जाणून घेणे अत्यंत गरजेचे असते. चांदापुरी चौकामध्ये वीज वितरण कंपनीचा विद्युत पोल उभा आहे. मात्र तो अवकाळी पावसाने वाकलेला आहे. जवळपास
व्यवसायाची दुकाने आहेत. सदर विद्युत पोल वरून अनेक विद्युत कनेक्शन आहेत. या मार्गावरून शालेय विद्यार्थी ,दुग्ध व्यावसायिक व पादचारी यांची वर्दळ असते .सदर विद्युत पोल कोसळून पडण्याच्या मार्गावर आहे .यामुळे मोठी दुर्घटना घडण्याचा संभव आहे. तरी या विद्युत पोलची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर कोपनर यांनी आमच्या प्रतिनिधी कडे केली