आज दिनांक 24-6-2021 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र माळीनगर चा कोरोना तपासणी कॅम्प दिनांक 1 जून ते 15 जून 2021 या कालावधीत माळशिरस तालुक्यात सर्वात जास्त टेस्ट केल्यामुळे तालुका प्रशासनाच्या वतीने प्रथम क्रमाकांचे बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला .
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र माळीनगर विषयी सर्व अधिकारी यांनी गौरवोद्गार काढले, तालुक्यात प्रथम क्रमांकाच्या टेस्ट चे नियोजन याबद्दल सविस्तर माहिती आरोग्य सहाय्यक श्री दादासाहेब फुंदे यांनी दिली ,आरोग्य सेविका श्रीमती रोटे जे बी यांनी आपल्या मनोगतातून सर्वांना प्रेरणा दिली.
प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संकल्प जाधव ,डॉ.अंकुश दर्गो पाटील कर्मचारी प्रतिनिधी म्हणून , श्री रूपनर आबा ,श्री अमोल सावंत ,श्री नवनाथ कपने उपस्थित होते. हा सत्कार माननीय प्रांतधिकारी शमा पवार मॅडम आणि तहसीलदार जगदिश निंबाळकर साहेब, माळशिरस नगरपंचायत चे मुख्याधिकारी श्री वडजे साहेब, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर रामचंद्र मोहिते साहेब, डॉक्टर शहा साहेब यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रतिनिधी उपस्थित होते. डॉ. खडतरे सर, श्री राजू शेख,डॉ.आव्हाड सर श्री लाड भाऊसाहेब ,श्रीमती जाडकर भगिनी यांनी आपले मनोगत व्यक्त केले….🌹🌷🙏🙏🥰