भंडारा विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 25 जून 2021:-
भंडारा आणि जिल्ह्यात सुरू असलेली धान खरेदी त्यामाध्यमातून होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक आणि गैरव्यवहार यासंदर्भात माहिती देण्याच्या दृष्टीने व दोषींवर कारवाई व्हावी या मागणीला घेऊन खासदार सुनील मेंढे यांनी आज केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची दिल्ली येथे भेट घेत एक निवेदन दिले. धान खरेदी केंद्रावर होणाऱ्या गैरव्यवहाराची सीबीआय चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सोबतच वन नेशन वन राशन योजनेची अंमलबजाणी भंडारा गोंदिया जिल्ह्यात होत नसल्याने अनेकांचा अधिकार डावलला जात असल्याचे सांगून या संदर्भात निर्देश देण्याची मागणी त्यांनी केली. त्यांच्या सोबत यावेळी श्री सुदीप सिंग कार्यकारी संचालक भारतीय खाद्य महामंडळ, श्री.एस.जगन्नाथ सहसचिव, माजी आ.चरणभाऊ वाघमारे, बाळाभाऊ काशीवर उपस्थित होते..