चंद्रपूर विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 24 जून 2021:-
चिमूर तालुक्यातील काजळसर येथील ग्राम पंचायत सदस्या कु. सत्त्वशीला खोब्रागडे यांनी भारतीय क्रांतिकारी संघटनेच्या कार्यप्रणालीवर प्रेरीत होऊन भारतीय क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.डार्विन कोब्रा सर याचें नेतृत्वात प्रवेश घेतला.
सत्त्वशीला खोब्रागडे ह्याचां सामाजिक कार्यात रूची असल्याने समाजातील ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असतात. मागील ग्राम पंचायत निवडणुकीत बहुमताने विजयी झाल्या. सामाजिक कार्याची तळमळ पाहून भारतीय क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डार्विन कोब्रा यानी कु. सत्त्वशीला खोब्रागडे याचंशी भेट घेऊन भारतीय क्रांतिकारी संघटना महिला आघाडी चिमूर तालुका अध्यक्ष पदी नियुक्त केले. यावेळी काही महिलांनीसुद्धा सदस्यता स्विकारली.
भारतीय क्रांतिकारी संघटनेचे उपाध्यक्ष टेरेन्स कोब्रा, नागभीड शहर उपाध्यक्ष विशाल भसारकर यांनी महिलांना जास्तीत जास्त संख्येने सामील व्हावे असे आवाहन केले.
भारतीय क्रांतिकारी संघटनेचे महासचिव अजय भाऊ कोसे, नागभीड शहर अध्यक्ष नंदूभाऊ खापर्डे, शहर सचिव परवेज साबरी, बीकेस महिला आघाडीच्या अध्यक्षा आशालता सोनटक्के, चिमूर तालुका अध्यक्ष आरिफ वारसी, कैलास भोयर, सांरग दाभेकर इत्यादीनी अंभिनदन केले. अशी माहिती
प्रसिद्धी प्रमुख संजय लाखे भारतीय क्रांतिकारी संघटना
यांनी दिली.