कोविड कामगिरीवरील मृत शिक्षकांच्या वारसादारांसाठी ५० लाख मदतीचा पहिला प्रस्ताव मंजूर शिक्षक परिषदेच्या वर्षभरासाठीचा पाठपुरावा यशस्वी
५० लाख विम्याची भरपाई पहिल्या मृत शिक्षकाच्या वारसदारांना मिळण्याचा शासन निर्णय निघाला…
राज्यात वर्षभरात अनेक शिक्षकांची मे २०२० पासून कोविडच्या कामासाठी नियुक्ती करण्यात आली होती. राज्यभरात आजपर्यंत जवळपास २२१ पेक्षा जास्त शिक्षकांचा कोविड नियंत्रणाच्या कामावर असताना मृत्यु झाला आहे.ही संख्या आता वाढली आहे.
५० लाखांच्या विमाकवच शिक्षकांना लागू केले नव्हते. यासंदर्भात शिक्षक परिषदेचे आमदार श्री. नागो गाणार यांनी सततचा पाठपुरावा केला होता. तसेच शिक्षक परिषदेने दि. ३.५.२०२१, दि. ९.५.२०२१, दि. १३.५.२०२१, दि. २६.५.२०२१, दि. ९.६.२०२१ ला आणि दि. १६.६.२०२१ ला आमदार नागोराव गाणार यांनी शासनाचा तीव्र शब्दांत धिक्कार केला होता.जळजळीत पत्रव्यवहार करुन म्रुत शिक्षकांच्या कुटुंबाची व्यथा याबाबत मा. मुख्यमंत्रीसाहेबांना कळवली होती. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मुंबई विभागाने ४ पेक्षा अधिक पत्रे दिली, तसेच आमदार नागो गाणार यांची २०२० या वर्षभरातील याबाबतची पत्रे यांची दखल राज्य शासनाला घ्यावी लागलीच. शासन निर्णय निर्गमित झाल्यावरही काम होत नव्हते. प्रस्ताव पुढे पाठवले जात नव्हते. परवाच21/6/2021ला मृत कै. तौफिकअली बादशहा अत्तार, सर वाळवा, जिल्हा सांगली या सरांच्या वारसदारांना ५० लाख रुपयांच्या विम्याची रक्कम मंजूर करण्यात आल्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
अशाप्रकारे ५० लाख विमा संरक्षण मिळवण्यासाठी चालू असलेल्या शिक्षक परिषदेच्या पाठपुराव्याला यश आले आहे. आमदार श्री. नागो गाणार यांनी २२१ प्रस्तावांसाठी मार्च २०२१ पर्यंत दाखल झालेल्या प्रस्तावांसाठी पाठपुरावा सुरुच ठेवला होता. तसेच शिक्षक परिषद मुंबई कार्यवाह शिवनाथ दराडे यांचा ही पाठपुरावा सुरूच होता. काही मृत शिक्षकांच्या वारसदारांनी विम्यासाठी केलेल्या अर्जांवर अजून निर्णय झालेला नाही.काही ठिकाणी प्रस्ताव सादर केलेले नाही. यांची संख्या आता ३०० च्या वर जाऊ शकते. त्यामुळे उर्वरित सर्व शिक्षकांच्या वारसांना ५० लाख रुपयांची रक्कम मिळावी यासाठी, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू सर, राज्य कार्यवाह नरेंद्र वातकर यांचा पाठपुरावा सुरुच राहणार आहे. तसेच २०१३ पासून शालेय शिक्षण विभागात अनुकंपा भरती प्रलंबित आहे, त्यामुळे मृत शिक्षकांच्या वारसांना तात्काळ अनुकंपा तत्त्वावर नोकरी तर सामावून घ्यावे, अशी मागणी कायम आहे.
“शासन निर्णय”
Page 1
Page 2
Page 3
दै. महाराष्ट्र टाईम्ससने हा विषय २ वेळा लावून धरला. दै. वृत्तमानस, सकाळ, लोकमत, महानगर, पुण्यनगरी, पुढारी अशा राज्यभरातील इतरही वृत्तपत्रांमधून याची दखलही घेण्यात आली होती.
शिवनाथ दराडे
कार्यवाह,
शिक्षक परिषद – मुंबई
Vis