शाहीद शेख मित्र परिवार यांच्या वतीने दबासेवस्ती,चांदापुरी नवीन मस्जिद समोर कार्यक्रम
पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील दबासेवस्ती,चांदापुरी येथे नवीन मस्जिद इमारत बांधकाम समोर महाराष्ट्राचे युवा नेते आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेते शिवराज पुकळे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.
कोरोणा कालावधीत मरण पावलेल्या लोकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी वाढदिवस साजरा करनार नाही असे जाहीर केले आहे त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ऑक्सिजन अभावी लोकांचे मृत्यू झाल्याचे लक्षात घेऊन ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या झाडांचे महत्व सांगून वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन नितेश राणे यांचे समर्थक शाहिद शेख मित्र परिवार,चांदापुरी यांच्या वतीने करण्यात आले .यावेळी सिव्हिल इंजिनियर यासीन पठाण साहेब, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर खंडू माने, ज्येष्ठ नेते नासिर भाई सय्यद, अरुण भाऊ बोडरे, मुझफ्फर सय्यद ,पत्रकार रशीद शेख, जहीर सय्यद,अर्सलान शेख युवा मित्र व कार्यकर्ते उपस्थित होते.सुत्रसंचालन उदयन म्हेत्रस यांनी केले व आभार प्रदर्शन नासीरभाई सय्यद यांनी केले.