कडेगाव प्रतिनिधी.
कोरोना महामारीमुळे अनेक लोकांना अन्ना विना परवड सोसावी लागत आहे तसेच सातत्याने होणाऱ्या टाळेबंदीमुळे लोकांना कामापासून मुकावे लागत आहे यामूळे लोकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे शेतमजूर महिला अल्पभूधारक वर्ग यांच्यासारखा वंचित घटकांना प्रचंड हालाखीचे जीवन जगावे लागत आहे या सर्व बाबींचा विचार करून राष्ट्रवादी जि प गटनेते शरद भाऊ लाड यांनी अशा कुटुंबांना आधार देण्याचा निर्धार केला आहे
शरद भाऊ लाड यांच्या माध्यमातून कडेगाव तालुक्यातील 500 कुटुंबाना जिवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात येत आहे याच पाश्र्वभूमीवर वांगी ता कडेगाव येथील 20 कुटुंबाना जिवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले
यावेळी बोलताना शरद भाऊ लाड म्हणाले कष्टकऱ्यांच्या हाकेला धावुन जाण्याचे व अश्रु पुसण्याचे बाळकडू आम्हास स्व जि डी बापूसो लाड यांचे कडुन मिळाले आहे आमदार अरुण अण्णा लाड व लाड कुटुंबीयाच्या माध्यमातून आम्ही हा उपक्रम चालू केला आहे याच माध्यमातून निराधार व गरजू लोकांना आधार देण्याचे कर्तव्य एक प्रामाणिक जनसेवक म्हणून पार पाडत आहे यावेळी रमेश भाऊ एडके बाळासाहेब वत्रे सतीश तुपे पांडुरंग होनमाने आबासो शिंदे शामराव हुबाले दिलीप मदने अनिल कुंभार दिलीप देशमुख सुनिल चव्हाण संजय कांबळे जगन्नाथ चव्हाण राजेंद्र वत्रे वासुदेव बोडरे अशोक वत्रे नितीन जंगम यांच्या सह मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते